नांदेड :- नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही संविधानातील मूल्ये आणि तत्त्वांचे स्मरण केले.
या कार्यक्रमाला सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत थोरात, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. एस. बी. खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, समाजकल्याण अधिकारी रेखा शेंडगे, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, कार्यकारी अभियंता संजय नाईक यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक बालाजी नागमवाड, शुभम तेलेवाड, गजेंद्र श्रीरामवार, शिवसांब चेंड्डू, प्रकाश तुतुरवाड, रणजीत गजभारे, बालाजी आवर्दे, जगदीश कोनकेवार, संतोष गायकवाड, गजानन आगरमोरे, बालाजी फोले, सौरभ सावरकर, संतोष लाठकर, सुरज नाईक, किशोर खिल्लारे, अनिल भेदे, उज्वला गजभारे, इंदुमती वाघमारे, स्नेहल वळसे, वैशाली थोरात, शालिनी शेळके, मीनाक्षी कांबळे, प्रभावती चोळाखेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद व्यवहारे यांनी केले.