कुपवाड सिध्दचक्र विधानाच्या सातव्या दिवशी ५१२ अर्ध्य समर्पित

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/11/2026 7:08 AM

*महाइक्षुदंड अर्चना विधी सोहळा उत्साहात; आचार्य विद्यासागर महाराज व मुनी संघाचा आहारविधी संपन्न*

कुपवाड : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल)  आयोजित श्री सिद्धोत्सव आराधना व विश्वशांती महायाग महामहोत्सवांतर्गत सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी सातव्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. या दिवशी सिद्धचक्र महामंडल विधानातील ५१२ अर्घ्य समर्पित करण्यात आले. तसेच महाइक्षुदंड अर्चना विधी सोहळा श्रद्धापूर्वक संपन्न झाला.

सकाळी आचार्य विद्यासागर महाराज व मुनी संघाचा आहारविधी पार पडला. यावेळी श्रावक-श्राविकांनी भक्तिभावाने आहारदान करून धर्मलाभ घेतला. त्यानंतर राजा श्रीपाल व मैना सुंदरी यांच्या मंगल वाद्यघोषात निघालेल्या मिरवणुकीने मंडपात मंगल आगमन झाले. जलकुंभ मिरवणुकीने धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला.

सकाळी ८ वाजता श्री सिद्धचक्र विधानाचे आचार्य भगवंतांच्या सान्निध्यात पंचामृत अभिषेक, शांतिधारा व यंत्राभिषेक करण्यात आला. चक्रवर्तींद्वारे जिनमंदिरामध्ये विशेष पूजा तसेच यागमंडल विधानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रावक-श्रावक-श्राविकानीमोठ्या संख्येनी पूजाविधीत सहभाग घेतला.

दुपारी ३ वाजता त्यागींचे मंगल प्रवचन झाले. धनपतीद्वारे रत्नवृष्टी, होम-हवन आदी धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी जिनशास्त्राचे श्रवण आणि जिनशास्त्र मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

रात्री ७ वाजता जाप्य, आगामी भव्य श्री विहार रथोत्सवाचा सवाल, आरती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण दिवस मुख्य सभामंडपा समोर व परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी कुपवाडसह परिसरातील जैन समाजातील श्रावक-श्राविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या