मोहोद्य,
नमस्कार मी "भारतीय माहिती अधिकार" ह्या संविधानिक हक्क अधिकार जागृत निर्भिड वृत्तपत्र,निड़र RTI News Network' Live वेब पोर्टल न्यूज़ चैनल तसेच संघटनात्मक कार्यप्रणालीचा चालक- मालक-प्रकाशक मुख्यसंपादक शौकत नायकवड़ी तसे मि आपणातलाच एक सर्वसामान्य "भारतीय" माझे जन्म 20 मे 1982 साली कोल्हापुर,महाराष्ट्र येथे झाले वडिलांच्या व्येवसाय निमित्त आम्ही सन 1986/87 साली सांगली,महाराष्ट्र या नाट्यपंढरी,आरोग्यसंपन्न, व्यापार वृद्धि, राजकीय समीकरनाणे उत्तेजित कला कौशल्याने नटलेल्या अश्या ह्या सर्वसंपन्न नगरित वास्तव्यस आलो आणि येथूनच माझ्या आयुष्यातील खऱ्या शिक्षणाचे धड़े गिरवीन्याचे म्हणजेच आई वडिलांनि गांव सोडून वेगळा थाटलेला स्वंसार सुरुवात त्यातच परिस्थितिने तंग पण खुद्दारीने कष्टाचे उदरनिर्वाह करुन समाधान पूर्वक कसे जगावे हि स्वंस्कारीत जड़न घड़न कष्टाने ,खुद्दारीने सामान्य सामाजिक परिपूर्ण असे सुंदर आमचे जगजीवन ह्या सगळ्याच प्रवासातून जाता जाता लवकरच परिस्थितिने अंगावर आलेली जबाबदारी म्हणजे धडपडत धडपडत शाळा शिकत शिकत काम करने वयाच्या 10व्या वर्षिच कळले आम्हा "दाल आटे का भाव" आश्यातुनच पुढे आले तरुणपण आता थोड़ी परिस्थिति ही सुधारली पण राहून राहून परिस्थितीने अर्धवट सोडलेला शिक्षणक्रम पूर्ण करण्याची अंतर मनातून उत्कंठहोणारी वेदना ती तडफ शाळेतील संपर्कात असलेल्या एका मित्राला जाणवायची आणि एके दिवशी त्याच मित्राने माहिती काढली कि यशवंतराव मुक्त विद्यापीठ(शांतीनिकेतन) मध्ये माझ्या सारख्या परिस्थितीने शिक्षण अपूर्ण असणाऱ्यांसाठी कमवा व शिका हा शासनमान्य उपक्रम राबविला जातो आणि काम करत करत शिकण साठी फक्त रविवार एक दिवसच कॉलेज असतो अशी कल्पना दिली मग काय लगेच बंदा हजर...थोड़ा रहिलेला शैक्षणिकक्रम पूर्ण करणेचा प्रयत्न केला तितक्यात गड़बड़ीत लग्न ही झाले स्वंसार प्रवास सुरु झाले अश्या ह्या जीवनाच्या प्रवासात वेगळे काहीतरी करण्याची तळमळ जीज्ञा समाजात राहून आपणही समाजाचे काही देणे लागतो ह्या जाणीवेतुन समाज कार्य करणेची आवड़ त्यातच सन 2005 साली महापुराने घरगुती अनपेक्षित आलेल्या अडचणीतुन आयुष्यात पहिल्यांदाच "माहिती अधिकार" चा यशस्वी वापर करुण न्याय हक्काच्या लढाईत पहिला वाहिला यश संपादन तेंव्हाच अनुभवले "संविधानिक हक्क अधिकार समान हक्क समान कायदा न्याय हक्काच्या लढ्यासाठी शैक्षणिक पदवी नसली तरी चालेल पण कलमाला सत्याची वैचारिक धार असावी लागते" परत हेच वैचारिक ब्रीद अंगिकारून अनेक कौटुंबिक वाद मिटविणे, अन्यायग्रस्त नागरिकांना कायदे हक्काचे तोंडीप्रबोधन करणे अश्या व इतर अनेक सामाजिक कार्य करत करत सन 2011 ला एका विषय "माहिती अधिकार"असणाऱ्या मासिक पत्रिकात पत्रकारिताची सुरुवात केली मग काही काळाने त्या पत्रिकेच्या मुख्यसंपादकांशी वैचारिक विचार न जुळलेने ते पत्रिकेला सोडने भाग पड़ले दूसरे एक आर्थिक अडचणी मुळे थांबलेले साप्ताहिक सुरु करणेचा निश्चय केला एक अंक हि प्रकाशित केला वाचकांचा प्रतिसाद हि मिळाला पण पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करनेचा प्रयत्न केला पण तोही निष्फळ ठरला परत राहून राहून तळमळ आपलेच विचार आपल्या हक्क अधिकार नुसार खुल्यामनाने मांडने करीता आपल्याला आपले स्वतःचे पत्रक काढ़ावे लागणारच मग काय ? असे विचार येताच सुरवात नव्या दमाची म्हणुन आयुष्यात नेहमीच ठरल्या प्रमाणे "जिंदगी हर कदम एक नयी जंग है " ची सुरुवात केली आणि भारत सरकार प्रसारण मंत्रालय दिल्ली येथे अधिकृत नोंदणी करुन 2013 साली आपल्या सर्वांच्या सहकार्यने "भारतीय माहिती अधिकार" संविधानिक हक्क अधिकार जागृत निर्भिड वृत्तपत्र चे समाजहिताचे संविधांक प्रबोधनात्मक निस्वार्थी कार्य सुरु केले आणि वाचक हितचिंतकांच्या आशीर्वादाने कार्यास भरारीहि मिळाली व दिवसंदिवस मिळतच आहे.
सुरुवातीच्या पहिल्या दिवसा पासून आज पर्यंत "भारतीय माहिती अधिकार" हया संविधानिक हक्क अधिकार जागृत वृत्तपत्राने शेतकरी आत्महत्त्या, बँकिंग प्रशासन, शैक्षणिक संस्था व त्यांचे बाजारीकरण, कामगार कायदा व कंत्राटी कामगारांचे प्रश्न व त्यांच्या वर होणारे अन्याय, ग्राहकांचे अधिकार व ग्राहक कायदे, स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये असणारे सर्वसामान्य भारतीय नागरिकांना कायद्याने दिलेले संविधानिक हक्क अधिकार... आशा व इतर अनेक सर्वसामान्य भारतीय जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम "भारतीय माहिती अधिकार"हया संविधानिक हक्क अधिकार जागृत वृत्तपत्राने निडर, निर्भीड,निष्पक्ष पणे केले आहे व करीत आहे करीत राहणारच , तसेच प्रामाणिक व संविधानिक पणे अन्याय विरुद्ध कायदेशीर मार्गाने लढणाऱ्या भारतीय RTI कार्यकर्त्यांना स्वतःचे हक्काचे भारत सरकार मान्यताप्राप्त नोंदणीकृत रजिस्ट्रड व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न हि केला आहे व करीत राहणार.... सदर "भारतीय माहिती अधिकार" हया संविधानिक हक्क अधिकार जागृत वृत्तपत्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या संविधानिक कायदेशीर माहिती मुळे अनेक सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लागले आहेत, त्यामुळेच सदर "भारतीय माहिती अधिकार" हया संविधानिक हक्क अधिकार जागृत वृत्तपत्राची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे .सदर "भारतीय माहिती अधिकार" हे वृत्तपत्र चालविण्या करीता शासनाकडून कोणत्याही स्वरूपाचे अनुदान आज अखेर मिळत नाही व मिळाले नाही, तसेच कोणत्याही राजकीय पक्षांकडून अथवा मंत्री- नेत्यांकडून आणि हो बेकायदेशीर मार्गाने देखील आर्थिक मदत आज पर्यंत घेतली जात नाही व घेणारही नाही.
तरी सदर "भारतीय माहिती अधिकार"हा संविधानिक हक्क अधिकार जागृत वृत्तपत्र चालविण्या करिता सुरुवातीला काही वर्ष आपल्या वैयक्तिक व्यवसायातून आपला कौटुंबिक उदरनिर्वाह चालवत चालवत वृत्तपत्रास येणारा प्रिंटिग खर्च करीत होतो नंन्तर नंन्तर संपूर्ण राज्यभरातील अनेक जिल्ह्यातून माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या,सर्वसामान्य नागरिकांच्या कडून उत्साहवर्धक प्रशंसा मिळू लागल्या तसेच वाचकांची ही मागणी वाढू लागली तस तसे खुप आर्थिक अडचणी येवू लागली काही काळ आर्थिक अभावि कार्य थांबीवले घरचे ही वैतागले होते कारण हे कार्य कमाई चे नाही ध्येय वेङयांचे आणि काही काळ शांत राहून आर्थिक उत्पन्नसाठी स्व:च्छदिलाने निःस्वार्थी पणे उपक्रम नियम बांधनी केली व कोल्हापुर येथे एक नियुक्ति मेळावा घेतला आणि सर्व सदस्यांच्या समोर कार्याला येणाऱ्या अडी-अडचणी विषयी माहिती दिली आणि सर्वांच्या संमतीने एकमताने आपसातच वर्गणी पद्धतीने दरमहा(कॉन्ट्रब्यूशन) गोळा करुन स्वतःच्या खर्चाने खुशी खुशी अंक प्रिंटिंग करायचे आणि वार्षिक उपक्रम पद्धतीने समाजहिताचे आपले कार्य सुरु ठेवायचेच असे ठरले व आजपर्यंत करीत आहेत, मुख्यसंपादक, संपादकीय मंडळामध्ये असणाऱ्यांचे छोटेछोटे,व्यापार व्यवसाय असून फक्त अन्याया विरुद्ध,भ्र्ष्टाचार विरुद्ध लढण्याची इच्छाशक्ती व राजकीय, प्रशासकीय , वैधकीय,शैक्षणिक क्षेत्र असो किंवा बैंकिग,माहिती अधिकार, मीडिया क्षेत्र या सर्व क्षेत्रातील काही बाजारुप्रवृत्ति चा बिमोड करण्याच्या उद्धेशाने आणि आपण ज्या सुजलाम सुफलाम " भारत " देशात राहतो त्या देशाची बांधिलकी याची जपनुक करण्याच्या जाणिवेतून आम्ही कोणतीही जातपात न जुमानता फक्त मानव आणि मानवता हेच धर्म हे ब्रीद अंगीकारपणे आम्ही एकत्र येऊन गेले पाच वर्षाने यशस्विपणे "भारतीय माहिती अधिकार" हे संविधानिक हक्क अधिकार जागृत वृत्तपत्र चालवत आहोत आणि पुढे हि यशस्वीरीत्या आर्थिक अडचण येवू नये व समाजहिताचे सामाजिक संविधान प्रबोधनात्मक कार्य करणारे भारत सरकार द्वारे मान्यता प्राप्त अधिकृत बहु भाषिक रजिस्टर्ड असणारे आमचे वृत्तपत्र जास्तीत जास्त बहु भाषिक छपाई होवून भारतात सर्वत्र विस्तारीत होवून मोठ्या प्रमाणात प्रकाशित होवून अनेक अन्याय ग्रस्त नागरिकांना संविधान साक्षर करणेस मदत व्हावे आणि हे कार्य इथेच न थांबवता पुढे संविधान,माहिती अधिकार,मानव अधिकार ,ग्राहक कायदे जनजागृती प्रसार प्रबोधन कार्य शाळा,मेळावे,अधिवेशन इत्यादी समाजहिताचे बहुपयोगी कार्य करणेचा मानस बाळगलेला आहे आणि त्या करीताच मनुष्यबळ हि पाहिजेच तसेही सामाजिक संघटनात्मक कार्य करताना संघटन हे संघटीत होण्याणेच करता येतो म्हणूनच सामाजिक १००%शुध्द कार्य करणेची इच्छा असणाऱ्या चांगल्या कार्यकर्त्यांसाठी ,युवकांसाठी हक्काचे वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून अनुभव अनुसार "संविधानिक हक्क अधिकार समान हक्क समान कायदा न्याय हक्काच्या लढ्यासाठी शैक्षणिक पदवी नसली तरी चालेल पण कलमाला सत्याची वैचारिक धार असावी लागते" परत हेच वैचारिक ब्रीद अंगिकारून संविधानिक हक्क अधिकार नुसार काही नियमांच्या कसोटीवर साम,दाम,दंड,भेद; वृत्तपत्र/वेबपोर्टल शेत्रातील पद मक्तेदारवृत्ती बाजूला सारून या क्षेत्रात जास्तीत जास्त प्रमाणात चांगल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना ,तरुण वर्गाला आपल्या कलाकौशल्य,कलमाला असणारी सत्यथाची वैचारिक धार आजमवणेसाठी त्यांना क्षेत्र सन्मान पद-नाव प्रतिनिधि, जिल्हा,तालुका (संपादक समन्वयक माहितीदूत) असे अधिकृत पणे निवड करुन आमच्या या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवून त्यांना सन्मानपूर्वक नियुक्तिपत्र,कार्यालयीन कार्यवापर ओळखपत्र देवून त्यांच्या कडून देखील(वार्षिक कॉन्ट्रब्यूशन) योगदान ,वर्गणी कुरियर समाविष्ट वार्षिक रजिस्ट्रेशन फी कार्यकर्ता/प्रतिनिधीसाठी ;- २१००रु , वार्षिक वाचक सभासद(महाराष्ट्र) वर्गणी १५६रु, (महाराष्ट्र बाहेर) वाचक सभासद वर्गणी २१०रु वाचकांसाठी पोस्टलसह संविधानिक हक्क अधिकार नुसार वार्षिक आर्थिक मदत घेतो "कारण कोणतेही सामाजिक कार्य हे संघटनात्मक फंडिंग शिवाय करता येत नाही आणि आम्ही व्येवसायिकतेतुन 100%समाजकार्य करतो हेच कटु सत्य " त्यातूनच त्या कार्यकर्त्यांना आमच्या वृत्तपत्र/वेबपोर्टल चे सामाजिक बातमीदारी कार्य सोबतच संविधानिक हक्क अधिकार नुसार जाहिरात आणि वाचक सभासद नोंदणी मध्ये कमिशन माध्यमातून मानधन मिळविन्याची संधी ही देण्याचे सर्व संमतीने ठरले आहे म्हणतात ना कि येणारे सर्व धुतल्या तांदळा सारखे नसतील हि कारण क्षेत्र सन्माननीय, शिस्त प्रिय,संवेधनशील-मार्मिक आहे आणि हो...
"न कलम बिकती है, न कलमकार बिकता है,
न ही इस महँगाई में भी ये "पत्रकार" बिकता है,
खून से लहूलुहान'हो जाते हैं लिख लिख कर जब हाथ,
तब जाकर इस शहर में, कुछ रुपए का अखबार बिकता है"
हे ही ज्ञात आहे म्हणूनच कार्य पड़ताळनी करून संविधानिक हक्क अधिकार नुसार नियमांच्या कसोटीवर साम,दाम,दंड,भेद; खोटे,लबाड़,कार्यशुन्य,बहुरूपी, तोतये सामाजिक कार्यकर्ताचे वेषधारी तर काही वैचारिक विचार न जुळनारे,तर काहिंची प्रामाणिक प्रबळइच्छा असूनही परिस्थितिआड़ कार्य न करता येणारे ही असतात तर काहींना बाहेर हि काढावे लागते आणि त्यांना हि ते वाईट वाटतेच त्यातच ते भान विसरून संगत गट तैयार करून चुकलो पण चुकिच नाही जन्मजात स्वभावदुर्भाग्यच्या या अविर्भावत बिनबुडाचे वक्तव्ये म्हणजे स्वतः अनधिकृत असून भारत सरकार द्वारे नोंदणीकृत असणाऱ्या पदाधिकारीलांच तोतया म्हणतात आणि उलट बदनाम करणेचा प्रयत्न करुन चीखलफेक हि करतात परंतु ये पब्लिक हैं ये सब जानती हैं शेवटी काय तर कार्य काम बोलता हैं कळायला हवे नियमचौकट बांधणी अनुसार संमतीने ठरलेले नियम हे सर्वांसाठीच असतात आणि संविधानिक हक्क अधिकारनुसार दोघानाही आपली बाजू मांडनेचा अधिकार असतो पण कायदे कलमावर बोट ठेवूनच मांडायच असत असो हे असेच चालायचे ...
आज २०मे रोजी माझ्या वाढदिवस निमित्त सर्वांना एक गोड बातमी देतो कि आता काळाच्या गरजेनुसार आपल्या सर्व वाचक हितचिंतकाच्या सहकार्यानेच सामाजिक ध्येय,उद्धिष्ठ समोर ठेवूनच समाजहिताचे आवाज बुलंद करणारे उत्साहपूर्वक "RTI News Network" हा निड़र Live वेब पोर्टल न्यूज़ चैनल पण आपण सुरु करीत आहोत आपली प्रोस्तोहितवर्धक सदैव साथ मोलाची...
धन्यवाद....