नांदेड :- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 मधील कलम 54 नुसार नोंदणीकृत तसेच मान्यताप्राप्त बाल संगोपन संस्थांच्या तपासणीसाठी राज्य व जिल्हास्तरावर तपासणी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, पात्र इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासंदर्भात शासन निर्णय क्रमांक बालगृ-2017/प्र.क्र.211/का-8, दि. 21 मार्च 2018 अन्वये तपासणी समिती गठित करण्यात आली आहे. शासन निर्णयात नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक अशासकीय सदस्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नांदेड येथे वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत सादर करावेत.
इच्छुकांनी आपले अर्ज महिला व बाल विकास भवन, महात्मा फुले मार्केटच्या मागे, गणेश नगर रोड, नांदेड या पत्त्यावर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.