भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय प्रकोष्ठाच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजकपदी डॉ.सचिन संभाजी पाटील उमरेकर यांची नियुक्ती

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/11/2026 7:21 AM

नांदेड : - भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक विस्तारात आणि वैद्यकीय क्षेत्रातील कार्याला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने नांदेड येथील डॉ. सचिन संभाजी पाटील उमरेकर यांची भाजपच्या वैद्यकीय प्रकोष्ठाच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे.

डॉ. सचिन संभाजी पाटील उमरेकर हे गेल्या दोन दशकांपासून भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून सातत्याने पक्षसंघटनेत सक्रियपणे कार्यरत आहेत. पक्षाने वेळोवेळी सोपविलेल्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या या दीर्घकालीन संघटनात्मक कार्याची आणि योगदानाची दखल घेत त्यांच्यावर आता महाराष्ट्र प्रदेश स्तरावरील महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, सन २०१३ मध्ये वैद्यकीय प्रकोष्ठाच्या नांदेड सहसंयोजकपदापासून त्यांच्या या संघटनात्मक प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर सातत्यपूर्ण कार्य, पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रगती केली. नांदेडच्या सहसंयोजकपदापासून ते आता महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजकपदापर्यंत झालेली ही पदोन्नती त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीची आणि कार्याची पोचपावती मानली जात आहे.

सध्या डॉ. उमरेकर हे नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख म्हणूनही पक्षाची जबाबदारी सांभाळत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि पक्षसंघटनेतील सक्रिय सहभाग लक्षात घेता त्यांच्यावर प्रदेशस्तरावरील ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक म्हणून काम करताना राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, आरोग्य संस्था आणि वैद्यकीय व्यावसायिक यांच्याशी समन्वय साधून भाजपच्या वैद्यकीय प्रकोष्ठाचे संघटन अधिक मजबूत करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे.

डॉ. सचिन संभाजी पाटील उमरेकर यांच्या या नियुक्तीमुळे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघासह नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

दोन दशकांची पक्षनिष्ठा, सातत्यपूर्ण संघटनात्मक कार्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव यांची दखल घेत मिळालेली ही प्रदेशस्तरीय जबाबदारी डॉ. सचिन उमरेकर यांच्या राजकीय व संघटनात्मक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या