संविधान दिनानिमित्त नांदेडमध्ये 26 नोव्हेंबरला भव्य संविधान रॅली

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/11/2026 8:22 AM

नांदेड : भारतीय संविधान दिनानिमित्त गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर 2026 रोजी नांदेड येथे भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, नांदेड यांच्या वतीने सकाळी ८ वाजता या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.
या रॅलीचा प्रारंभ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते शिवाजीनगर, कलामंदिर, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचेल. तेथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे.
संविधानातील मूल्ये, लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचा जागर करण्यासाठी आयोजित या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या