DRUCC Meeting कार्यसूची
सांगली स्थानकावर आवश्यक मूलभूत सुविधा
१) सांगली रेल्वे स्थानकाचा दर्जा 'NSG2' श्रेणीत उन्नत (अपग्रेड) करणे कारण सांगली हे चंद्रयान, मंगलयान, सॅटेलाईट, राॅकेटचे जागतिक अंतराळ उद्योग केंद्र व जागतिक हळदी बाजारपेठ आहे. जरी वार्षिक प्रवासी उत्पन्न रू 21 कोटी असले तरीही विषेश दर्जा देण्यात यावा कारण देशाच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे.
२) सांगली येथून सुटणाऱ्या किंवा तिथे प्रवास संपवणाऱ्या गाड्यांसाठी 'ट्रेन वॉटर फिलिंग' (पाणी भरण्याची) सुविधा मंजूर करणे
३) 'रिटायरिंग रूम' (विश्रांती कक्ष) मंजूर करणे
४) 'क्लॉक रूम' (सामान ठेवण्याची खोली) मंजूर करणे
५) पार्सल बुकिंग सुविधा मंजूर करणे
६) सांगली स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. २ आणि ३ वर खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध करून देणे
७) सांगली स्थानकावर २४ तास 'सहायक' (कुली/हमाल) यांची नियुक्ती करणे
८) प्लॅटफॉर्म क्र. १ ला रिक्षा स्टँडशी जोडणाऱ्या रॅम्पचा उतार सौम्य आणि तो रॅम्प रुंद असावा; कारण सध्या ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि गर्भवती महिलांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
8) प्लॅटफॉर्म २ आणि ३ वर 'कोच इंडिकेटर्स' (डब्यांची स्थिती दर्शवणारे फलक) बसवणे
9) सांगली स्थानकावर अतिरिक्त दुसरी 'प्रवासी आरक्षण खिडकी' (Passenger Reservation Counter) सुरू करणे
10) उच्च श्रेणी (Upper Class) आणि महिलांसाठीच्या प्रतीक्षा कक्षात टीव्ही आणि वातानुकूलित यंत्रणा (AC) बसवणे
11) प्रतीक्षा कक्षात महिलांसाठी बालकांना स्तनपान करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे
12) स्थानकाच्या प्रवेशद्वारावर 'मे आय हेल्प यू' (मदतीसाठी) डेस्कची व्यवस्था करणे
13) नवीन प्रवासी आरक्षण केंद्राबाहेरील परिसरात (Circulating Area) पुरेसा प्रकाश/दिवे बसवावे
14) प्रवासी आरक्षण केंद्रात वातानुकूलित यंत्रणा (AC) बसवणे
15) सांगली रेल्वे स्टेशनवरून प्रवास सुरू होणार्या व प्रवास समाप्त करणार्या प्रवासी तसेच मालगाड्यांच्या क्रू ( लोको पायलट व ट्रेन मॅनेजर/गार्ड) ना हजेरी करणे व आराम करण्यासाठी मिरज स्टेशनवर जावे लागते. त्यांची अडचण दूर करण्यासाठी क्रु मॅनेजमेंट सिस्टीम व क्रू लाॅबी सांगली स्टेशनवर सुरू करावी. भारतीय रेल्वे प्रत्येक महत्वाच्या शहरात दोन पेक्षा जास्त रेल्वे टर्मिनल उभारत आहे जेणेकरून जास्त रेल्वे गाड्या सुरू करणे शक्य होत आहे. त्याचप्रमाणे सांगली रेल्वे स्टेशनवर टर्मिनल सुविधा व क्रू रनिंग रूम सुरू केल्यास सांगली बरोबरच पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर, ईचलकरंजी व ईतर महत्वपूर्ण महानगरातील प्रवाशांना जास्त रेल्वे गाड्या मिळू शकतील.
सांगली रेल्वे स्थानकावरील प्रलंबित पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करणे
1) प्लॅटफॉर्म १ ला प्लॅटफॉर्म ४, ५ आणि मालवाहतूक प्लॅटफॉर्म ६ शी जोडणारा पादचारी पूल (Foot Over Bridge) चे काम पूर्ण करणे
2) 'अमृत भारत योजने'अंतर्गत प्लॅटफॉर्म १, २, ३, ४ आणि ५ वर लिफ्ट आणि सरकते जिने (Escalators) लवकर बसवणे
3) सांगली स्टेशन इथे कोचिंग टर्मिनल आणि पिट लाईन (PIT Line) उभारणे
4) प्लॅटफॉर्म २, ३, ४ आणि ५ वर शेड/छत (Cover) बसवणे
5) सांगली स्थानकाच्या पूर्व बाजूला प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग (Entry/Exit) तयार करणे
6) स्थानकाच्या पूर्व बाजूला अतिरिक्त 'स्टेब्लिंग लाईन' किंवा 'लूप लाईन'ची व्यवस्था करणे
सांगली येथे गाड्यांचा थांबा
सांगली स्थानकावर गाडी क्र १२६२९/१२६३० निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेसचा थांबा देणे
गाडी क्र २२६८५/ २२६८६ यशवंतपूर-चंडीगड संपर्क क्रांती सांगली स्टेशनवर आठवड्यातून दोन दिवस थांबते. पण त्याच वेळेत आठवड्यातून दोन दिवस जाणारी गाडी क्र १२६२९/१२६३० यशवंतपूर-निजामुदीन संपर्क क्रांती सांगली स्टेशनवर थांबतात नाही. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ होते. जनरल तिकीट काढून प्रवास करणार्या अनेक प्रवाशांची अनेकदा गाडी चुकते. तिकीट विक्री करणार्या एजंट देखील सांगलीत दोन्ही संपर्क क्रांती थाबत नसल्याने सांगली ऐवजी मिरज ची तिकीटे प्रवाशाला देतात. त्यामुळे प्रवाशाला ना ईलाज दोन्ही संपर्क क्रांती पकडणेसाठी 14 ते 25 किलोमिटर दूर मिरज स्टेशनला जावे लागते. त्यामुळे दोन्ही संपर्क क्रांतीना सांगली स्टेशनवर थांबा द्यावा.
त्याच प्रमाणे नविन सुरू होणार्या प्रत्येक गाडीला सांगली स्टेशनवर थांबा द्यावा कारण सांगली हे जिल्हा मुख्यालायाचे स्टेशन आहे. वंदे भारत प्रिमियम गाड्यांची भरपूर तिकीट विक्री सांगली स्टेशनवरून होते. तसेच मिरजजची तिकीटे घेतलेले भरपूर प्रवासी सांगली स्टेशनवरून रेल्वे गाड्यांत चढ-उतर करतात.
सांगली स्टेशन पर्यंत रेल्वे गाड्यांचा विस्तार
२६१०१/२६१०२ नागपूर (अजनी) - पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा सांगलीपर्यंत विस्तार करणे
२०४९५/२०४९६ जोधपूर - हडपसर एक्सप्रेसचा सांगलीपर्यंत विस्तार करणे
हुबळी - मिरज अनरिझर्व्हड (सर्वसाधारण) एक्सप्रेसचा सांगलीपर्यंत विस्तार करणे
कुर्डुवाडी - मिरज डेमू (DEMU) गाडीचा सांगलीपर्यंत विस्तार करणे
हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी निजामबाद - पंढरपूर एक्सप्रेसचा सांगलीपर्यंत विस्तार करणे
नवीन गाड्या सुरू करणे
सांगली - तिरुवनंतपुरम/कोचुवेली एक्सप्रेस (मडगाव मार्गे)
सांगली - पुरी एक्सप्रेस (पंढरपूर, सोलापूर मार्गे)
सांगली - विशाखापट्टणम एक्सप्रेस (सोलापूर मार्गे)
सांगली - हावडा/सियालदह एक्सप्रेस (पंढरपूर, लातूर, नागपूर, बिलासपूर मार्गे)
गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या वाढवणे
११०२६/११०२७ सातारा - दादर एक्सप्रेस दररोज चालवणे व सांगली स्टेशनवर सकाळी 10 वा पोहोचावी
गाडी ११९७/११०९८ पुणे - एर्नाकुलम पूर्णा एक्सप्रेस दररोज चालवली जावी.
मिरज जंक्शनच्या मागण्या
साप्ताहिक गाडी क्र 11493/12494 मिरज-निजामुदीन दर्शन एक्सप्रेस रोज चालवा
साप्ताहिक गाडी क्र 20475/20476 मिरज-बिकानेर एकप्रेस रोज चालवा
हडपसर-जोधपूर एक्सप्रेस ला मिरज-जोधपूर एक्सप्रेस चालवावे
पुणे-हावडा, पुणे-दरभंगा, पुणे-वेरावल, पुणे-भुज एक्सप्रेस या ४ गाड्या मिरज पर्यंत विस्तार करावे
किर्लोस्करवाडी स्टेशन मागण्या
किर्लोस्करवाडी तिकीट आरक्षण केंद्र इतर स्टेशन प्रमाणे संध्याकाळी 8 पर्यत सुरू ठेवावे
12493/12494 दर्शन एक्सप्रेस, 11049/11050 कोल्हापूर-अहमदाबाद एक्सप्रेस व 16553/16554 बेंगळूरू-मुंबई एक्सप्रेसला किर्लोस्करवाडी थांबा द्यावा
कोल्हापूर-मिरज डेमू चा विस्तार किर्लोस्करवाडी पर्यत करावे
भिलवडी, माधवनगर व विश्रामबाग स्टेशनवर पादचारी पुल उभारावे
सोलापूर विभाग मागण्या
जत रोड व कवठेमहांकाळ येथे गाडी क्र 22155/22156 कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेसचा थांबा द्यावा
जत रोड व कवठेमहांकाळ स्टेशनवर पादचारी पुल उभारावे.