भोकर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतीसाठी १४.९५ कोटी मंजूर;आ.श्रीजया चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 26/11/2026 8:14 AM

नांदेड:-
भोकर येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यासाठी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यतेसह १४ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निर्णयाद्वारे यश आले आहे.

माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून भोकर येथे अपर पोलीस अधीक्षक पदाची निर्मिती झाली होती. या कार्यालयासाठी सुसज्ज प्रशासकीय इमारतीची आवश्यकता होती. त्याअनुषंगाने याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी याकरिता भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी पाठपुरावा चालवला होता. त्यांच्या मागणीची दखल घेत भोकर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी प्रशासकीय मान्यतेसह १४.९५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. ही इमारत भोकर - म्हैसा मार्गावर स्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या मागील बाजूस उभारली जाणार आहे. या निर्णयासाठी आ. श्रीजया चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या