अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात संविधान दिन उत्साहात साजरा

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 26/11/2026 8:16 AM

अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण; २६/११ हल्ल्यातील शहीदांना मौन श्रद्धांजली

अहिल्यानगर : जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचे स्मरण करण्यात आले. संविधानातील मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व नागरिकांना मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार रवीकुमार शिंदे
संपादक – आपलं सत्य अहिल्यानगर
Executive Member – AIMA MEDIA
Ahilyanagar District, Maharashtra
All India Media Association
हिंदी मराठी पत्रकार संघ – तालुका संघटक
भारतीय पत्रकार अधिकार – महाराष्ट्र राज्य

#अहिल्यानगर #संविधानदिन #जिल्हारुग्णालय #डॉबाबासाहेबआंबेडकर 

Share

Other News

ताज्या बातम्या