चिंचोली,महाटी,माळकौठा,सितानदी नाला,कामळज,चिलपिंपरी येथील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती माफियांविरुद्ध नांदेड पोलीसांची धडक मोहीमः पोलीस ठाणे मुदखेड व उस्माननगर हद्दीत छापे टाकून 05 कोटी 27 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व जागीच नष्ट

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/11/2026 7:28 AM

नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रातून चालणारा बेकायदेशीर वाळू उपसा, पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासनाचा महसूल बुडवून होणारी चोरटी वाहतूक मुळासकट मोडून काढण्यासाठी मा. राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, नांदेड व मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशान्वये व्यापक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

आज दिनांक 24/11/2026 रोजी सकाळच्या सुमारास मा. रामेश्वर वेंजणे, पोलीस उप अधीक्षक (नांदेड शहर), मा. शाम पानेगावकर, पोलीस उप अधीक्षक (बिलोली) व मा. वैभव पडवळ, परि. पोलीस उप अधीक्षक यांच्या नेतृत्वात पोलीस ठाणे मुदखेड येथील प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, शहरातील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच क्युआरटी, आरसीपी व त्यांच्या पथकांनी नदी पात्रातील वाळू उपसा केंद्रांवर एकाच वेळी छापे टाकले. या मोहिमेत जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरून एकूण 05 कोटी 27 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागीच जिलेटीनच्या कांड्यांनी ब्लास्ट करून नष्ट केला आहे.

पोलीसांनी पंचासमक्ष जप्त व नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाचे वर्णन 1) 10 मोठ्या लोखंडी बोटी (प्रत्येकी 30 लाख रु.) 3,00,00,000/- (जिलेटीन कांड्यांनी जागीच ब्लास्ट करून नष्ट) 2) 04 छोट्या बोटी (प्रत्येकी 15 लाख रु.) 60,00,000/- (जागेवर नष्ट) 3) रेती उपसा करणारे 02 इंजिन 5,00,000/- (जागेवर नष्ट) 4) चार हायवा-1,60,00,000/- 5) 50 ब्रास रेती (प्रत्येकी 5,000/- रुपये ब्रास) 2,50,000/- असा एकूण 5,27,50,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरील प्रकरणी पोलीस ठाणे मुदखेड आणि उस्मानगर येथे वाळू माफिया, चालक व वाहन मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) व महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार कठोर गुन्हे दाखल करण्याची प्रकीया सुरु आहे.

ही कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशाने मा. संदिप जाधव, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मा. रामेश्वर वेंजणे, पोलीस उप अधीक्षक (नांदेड शहर), मा. शाम पानेगावकर, पोलीस उप अधीक्षक (बिलोली) व मा. वैभव पडवळ, परि. पोलीस उप अधीक्षक यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक / गणेश कराड (मुदखेड), पोउपनि / गजानन गाडेकर, पोउपनि/खंडु दर्शने, पोउपनि / सय्यद, पोउपनि शिंदे तसेच मुदखेड व उस्माननगर येथील पोलीस अंमलदार तसेच क्यू.आर.टी. व आर.सी.पी. पथकातील अंमलदार यांनी पार पाडली आहे.

नांदेड जिल्ह्यातील नदीपात्रातून बेकायदेशीर उपसा करून पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्या वाळू माफियांची कोणतीही गय केली जाणार नाही. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशा प्रकारची 'विशेष मोहीम' यापुढेही अविरत चालूच राहील.

Share

Other News

ताज्या बातम्या