देवळालीतील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, भाजपा उद्योग आघाडीचे निवेदन

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 23/11/2026 6:25 PM

देवळालीतील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, भाजपा उद्योग आघाडीचे निवेदन

देवळाली कॅम्प | प्रतिनिधी

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सार्वजनिक शौचालयांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. विशेषतः दगड चाळ, रेस्ट कॅम्प, वॉर्ड क्र. 5 बनात चाळ, शांती सदन, शिवाजी बहुला व मातंगवाडा परिसरातील शौचालयांची अवस्था बिकट झाली आहे. दरवाजे तुटलेले, पाणी नाही, अस्वच्छता व दुर्गंधीमुळे महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तत्काळ उपयोजना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे भाजप उद्योग आघाडीचे पंकज शेलार यांनी केली आहे.

बनात चाळ, शांती सदन येथील सविता घेगडमल, नसरीन सय्यद, ज्योती भगत, कल्पना हिरे, नयना पगारे, अर्चना हिरे आदी महिलांनी वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली गेली नाही. कोरोना काळानंतर या शौचालयांकडे प्रशासनाने ढुंकूनही पाहिलेले नाही, असा आरोप आहे.

आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता केवळ वातानुकूलित कक्षात बसून राहतात. प्रत्यक्ष पाहणी केली जात नाही. त्यांच्या बेजबाबदार वृत्तीमुळेच स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे, असा आरोप   निवेदनाद्वारे
करण्यात आला.

महिलांनी तक्रार करतांना सांगितले कि आम्हाला केवळ मतदानाच्या दिवशी आठवले जाते, अशी संतप्त भावना महिलांनी व्यक्त केली. भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश सदस्य पंकज सुरेश शेलार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तात्काळ दुरुस्ती, स्वच्छता, पाणी व लाईटची व्यवस्था करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा  महिलांनी दिला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या