कापसी बु येथे २९ नोव्हेंबरला माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते श्री बालाजी स्टोन क्रेशर, RMC प्लांट, HOT मिक्स प्लांटचे उद्घाटन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 26/11/2026 5:59 AM

नांदेड :
लोहा तालुक्यातील कापसी बु येथील श्री बालाजी स्टोन क्रेशर, RMC प्लांट, HOT मिक्स प्लांटचे उ‌द्घाटन सोहाळा २९ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून कार्यक्रमाचे उ‌द्घाटक म्हणून माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे उपस्थित राहणार आहेत. उ‌द्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरु असून प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे यांच्या स्वरराज गीत संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कापसी बु येथे गंगाखेड पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजपाचे माजी परभणी जिल्हाध्यक्ष श्रीराम मुंडे यांचे चिरंजीव बालाजी श्रीराम मुंडे यानी श्री बालाजी स्टोन क्रेशर, RMC प्लांट, HOT मिक्स प्लांटचे उ‌द्घाटन उभारला आहे. या प्लांटचा भव्य उ‌द्घाटन सोहळा २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सर्व प्लांटचे उद्‌घाटन माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे असणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते नामदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर, माजी आमदार गोविंद आण्णा केंद्रे, माजी आमदार डॉ मधुसूदन केंद्रे, माजी आमदार मोहन आण्णा हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्या प्रणिता देवरे चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शरद पवार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ मुरकुटे, विठ्ठल रबदडे मामा, गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्रसिंग बंगई, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड व्यंकटराव तांदळे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर महाराज केंद्रे, माजी सभापती बालाजी पाटील मारतळेकर, आनंदराव पाटील ढाकणीकर, डॉ सचिन उमरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सावळे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार, सुभाष गायकवाड, चिखलीचे सरपंच सचिन पाटील चिखलीकर, माजी पंचायत समिती सदस्य गणेश उबाळे, माजी सरपंच केरबा पाटील वडवळे, माणिकराव मुकदम, शंकरराव ढगे, नारायणसिंग

तबेलेवाले, रमेशराव सानप, धनराज गुट्टे, गोपाळ मुंडे, शाम धुत, सुशीलकुमार सिसोदिया हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे यांच्या स्वरराज गीत संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कापसी बु येथील सर्व गावकरी मंडळी गेल्या आठ दिवसांपासून मेहेनत घेत आहेत. कार्यक्रमास कापसी व पंचक्रोशीतील नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी सभापती श्रीराम मुंडे, बालाजी मुंडे, रवी सानप, सुशील मुंडे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या