कुपवाडमध्ये सिध्दचक महामंडल विधानात १०२४ अर्ध्य अर्पण, उद्या भव्य रथोत्सव

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/11/2026 6:51 AM


* ११ रथ, एक हत्ती आणि २१ घोड्यांचा समावेश*

कुपवाड : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल) आयोजित २४ सिद्धशिलांसहित श्री सिद्धोत्सव आराधना व विश्वशांती महायाग महोत्सवांतर्गत मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी श्री सिद्धचक्र महामंडल विधानात आज १०२४ अर्घ्य अर्पण करण्यात आले.

महोत्सवांतर्गत सकाळी राजा श्रीपाल व मैना सुंदरी यांचे मंगल वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने मंडपात आगमन झाले. यावेळी हत्तीवरून जलकुंभ मिरवणूकही काढण्यात आली. त्यानंतर श्री सिद्धचक्र विधानात दिवसभर 1024 अर्घ्य अर्पण करण्यात आले.तसेच भगवंतांचा पंचामृत अभिषेक, शांतिधारा, यंत्राभिषेक तसेच चक्रवर्ती द्वारे विशेष पूजा विधी पार पडले.

दुपारी आचार्य विद्यासागर महाराज व त्यागीचे मंगल प्रवचन, धनपतीद्वारे रत्नवृष्टी तसेच होम-हवन विधी संपन्न झाले. सायंकाळी धर्मध्वजा घेऊन मिरवणूक काढण्यात आली. रात्री जाप्य, आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दरम्यान, उद्या बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता महोत्सवांतर्गत भव्य रथोत्सव शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत ११ रथ, एक हत्ती, २१ घोडे तसेच चार ते पाच वाद्यपथकांचा समावेश असणार आहे. या भव्य शोभायात्रेमुळे कुपवाडमध्ये धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून, परिसरातील जैन बांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या