नांदेड :- संविधान दिन आणि क्रांतिवीर लहुजी साळवे जयंतीचे औचित्य साधून समाजप्रबोधनपर व्याख्यान, तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी नांदेड येथे करण्यात आले आहे. बहुजन शक्ती सेना महाराष्ट्र, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र आणि फकीरा विद्रोही विचारमंच महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल गणराज, नमस्कार चौक, नांदेड येथे हा सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अविनाश घाटे राहणार असून, खासदार रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख विशेष अतिथी म्हणून डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ साठे, आमदार आनंदराव बोंडारकर, आमदार बाबुराव कदम (हदगाव), माजी आमदार नामदेवराव ससाने, नांदेड महानगरपालिकेच्या महापौर कविताताई मुळे, नगरसेवक तथा माजी उपमहापौर उमेश पवळे आणि सर्जेराव दादा पाटील ढगे यांची उपस्थिती राहणार आहे.
प्रमुख वक्ते म्हणून सुशीलप्रकाश चिमोरे हे समाजप्रबोधनपर विचार मांडणार आहेत. तर प्रमुख उपस्थितांमध्ये नगरसेवक डॉ. मंजुषा प्रसाद रानवळकर, लसाकमचे मार्गदर्शक शिवा कांबळे, माजी सनदी अधिकारी व्ही. जे. वरवंटकर, लोकस्वराज्य आंदोलनाचे डॉ. रामचंद्र भरांडे, सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक मारुती वाडेकर, माजी नगरसेविका बेबीताई गुपिले, लसाकमचे महासचिव गुणवंत काळे, राज्य प्रवक्ते चंद्रकांत मेकाले, नांदेड महानगरपालिकेचे उपअभियंता प्रकाश कांबळे आणि पारेषण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत.
या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कामगार, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाजासाठी योगदान देणाऱ्या गुणवंत व्यक्तींना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा जागर करण्यासोबतच क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या सामाजिक योगदानाचे स्मरण करून समाजप्रबोधनाचा संदेश देण्याचा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, समाजबांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बहुजन शक्ती सेना महाराष्ट्र व फकीरा विद्रोही विचारमंच महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष विजय रणखांब, संस्थापक सरचिटणीस नरेंद्र खंदारे, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे नांदेड जिल्हाध्यक्ष रत्नाकर शिंदे, कार्याध्यक्ष पंडित तेलंग, विभागीय सदस्य गुणवंत मिसळवाड, उपाध्यक्ष रामदास पेंडकर, चंद्रकांत भांडवले, बाळासाहेब लोंढे, आकाश टोमके, शंकर रणखांबे, प्रशांत भिसे, दादाराव गुंडाळे, रवी रणखांब, सुनील कांबळे, बळीराम रणखांबे, बालाजी सकरगे आणि शिवकुमार मठवाले यांनी केले आहे.