खाली दिलेला अपील अर्ज भरा, त्यासोबत सूची आणि प्रगतीचा कालबद्ध आलेखही भरा.आपण अपील दाखल करीत असल्यास तक्रार/तक्रारदार हे शब्द काढून टाका.तक्रार दाखल केली जात असल्यास दुसरे अपील/अपीलकार हे शब्द काढून टाका. डबल स्पेसिंगमध्ये टाइप करून घ्या.
खालील गोष्टींची प्रत्येकी एक फोटोप्रत काढा -
माहितीच्या अधिकारांतर्गत केलेला मूळ अर्ज, सहपत्रांसहित पहिले अपील, त्याच्या सहपत्रांसहित अर्ज फी 10/- रु. तसेच इतर शुल्के भरल्यासंबंधीचा बँकेचा डिमांड ड्राफ्ट/पेस्लिप/पोस्टल ऑर्डर/रोखीची पावती
CPIO ने काही शुल्काची मागणी केली असल्यास त्या मागणीचे पत्र.
मूळ अर्ज तसेच पहिले अपील पोस्टाने पाठविल्याची पावती.
पोस्टाची पोचपावती / मुख्य जनसंपर्काधिकार्याकडून आणि प्रथम अपील प्राधिकार्याकडून मिळालेली अधिकृत पोचपावती.
मुख्य जनसंपर्क अधिकारी आणि प्रथम अपील प्राधिकार्याकडून मिळालेले निणर्य (असल्यास) सूचीनुसार सर्व कागदपत्रे क्रमाने लावा आणि प्रत्येक पानाच्या उजव्या वरच्या कोपर्यात पृष्ठक्रमांक लिहा. अशा रीतीने दुसर्या अपिलाचा/तक्रारीचा हा एक संच तयार होईल.
छायाप्रती काढून असे आणखी 4 संच बनवा.
अपील, सूची आणि अनुक्रम-तक्त्याच्या प्रत्येक पानावर सही करा. (सर्व पाचही संचांसाठी) सर्व छायाप्रतींवर “साक्षांकित” असे लिहून त्या शब्दाखाली सही करा म्हणजे सर्व प्रती ‘स्वयं-साक्षांकित’ बनतील.
एक संच स्पीडपोस्टने/रजिस्टर पोस्टाने/सर्टिफिकेट ऑफ पोस्टिंगद्वारा मुख्य जनसंपर्क अधिकारी आणि प्रथम अपील प्राधिकार्याकडे पाठवा आणि पाठवल्याचा पुरावा म्हणून पावतीची छायाप्रत (सूची /अनुक्रम तक्त्यामध्ये तपशील भरल्यानंतर) मूळ संचाला, दुसर्या अपिलाला/तक्रारीला तसेच आपल्या स्वतःच्या प्रतीला जोडा.
मूळ संच आणि त्याची एक जादा प्रत रजिस्टर्ड ए.डी. पोस्टाने आयोगाच्या खालील पत्त्यावर पाठवा -
निबंधक,
केंद्रीय माहिती आयोग,
दुसरा मजला, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस,
नवी दिल्ली 110066.
खाजगी कुरियर सेवांचा वापर टाळा.
आपल्याकडे संदर्भासाठी एक संच ठेवा आणि त्यासोबत पाठविल्याचा पुरावा तसेच दुसरे अपील/तक्रार मिळाल्याची मुख्य माहिती आयोग / मुख्य जनसंपर्क अधिकारी / प्रथम अपील प्राधिकार्याडून प्राप्त झालेली पोचपावतीही जपून ठेवा.
आपण दुसर्या अपिलाची/तक्रारीची एक प्रत, सहपत्रांशिवाय, पाठवून मुख्य माहिती आयोगामध्ये ह्याचा अधिक शोध घेण्याची विनंती करू शकता. आपण त्यासोबत रजिस्टर पोस्टाने पाठवल्याच्या पावतीची छायाप्रत देखील जोडू शकता.
पहिले अथवा दुसरे अपील दाखल करताना आपण आपल्या जवळील स्थानिक सेवाभावी संस्था, अशासकीय संस्था अथवा माहितीच्या अधिकारासंबंधात काम करणार्या व्यक्तींचाही सल्ला घेऊ शकता. ह्या प्रकारच्या सेवा साधारणतः फुकट असतात.