सरकार फाउंडेशनच्या फार्मा लीग क्रिकेट स्पर्धा – २०२६ चा मेगा ऑक्शन सोहळा उत्साहात संपन्न;भव्य चषकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण; फार्मा क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा सरकार फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/11/2026 7:04 AM

नांदेड : - खेळाडूंच्या अंगी असलेल्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन मिळावे आणि फार्मा क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व क्रिकेटप्रेमींना एकत्र आणून क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशाने सरकार फाउंडेशन, नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या फार्मा लीग क्रिकेट स्पर्धा – २०२६ चा मेगा ऑक्शन सोहळा शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी हॉटेल राजयोग, नमस्कार चौक, नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्यास विधान परिषद सदस्य,आमदार अमर भाऊ राजूरकर,नांदेड शहर पोलीस उपधीक्षक श्री रामेश्वर व्यंजने, सहाय्यक पोलीस उपअधीक्षक श्री वैभव पडवळ,महाराष्ट्र वैद्यकीय राज्य परिषदेचे अध्यक्ष,डॉ.संजय कदम,भगवती हॉस्पिटल चे संचालक तथा नगरसेवक मनपा नांदेड डॉ अंकुश देवसरकर,वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता फारुख अहमद,निमा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. श्रीराम कल्याणकर,प्रसिद्ध फार्मा उद्योजक बालाजी पाटील बोमनाळीकर,प्रसिद्ध उद्योजक अंजान पाटील सोळंके,डॉ राजेश तगडपल्ले, डॉ राहुल लव्हेकर, डॉ राहुल जाधव,केमिस्ट असोसिएशनचे दीपक पावडे,युवा उद्योजक मारोती पाटील शंखतीर्थकर,युवा उद्योजक साई भेंडेकर, युवा उद्योजक गजानन कत्ते तसेच सरकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्याम पाटील वडजे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे फार्मा लीग क्रिकेट स्पर्धेच्या भव्य चषकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.आकर्षक चषकाच्या अनावरणाने उपस्थित क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मेगा ऑक्शनच्या माध्यमातून खेळाडूंची निवड, संघांची बांधणी आणि आगामी स्पर्धेच्या नियोजनाला सुरुवात झाली.सदरील स्पर्धा ह्या 19,20 व 21 डिसेंबर 2026 रोजी नांदेड शहरात पार पडणार असुन त्याचा शुभारंभ हा 21 नोव्हेंबर रोजी मान्यवारांच्या हस्ते मेगा ऑक्शन करून करण्यात आला.

फार्मा क्षेत्रातील खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव देणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबतच खेळाची आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. केवळ फार्मा सेक्टरमधील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रातील सलोखा वाढविण्यास निश्चितच पूरक ठरणार आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सरकार फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि परस्पर सहकार्याची भावना विकसित होते. अशा स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.सदरील मेगा ऑकशन मध्ये एकूण 8 टीम च्या माध्यमातून जवळपास 125 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

सरकार फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प असून, फार्मा लीग क्रिकेट स्पर्धा हा त्याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग आहे. या उपक्रमामुळे नांदेडच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा उत्साह निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सिरसाट यांनी तर आभार प्रदर्शन हे पंकज शिंदे यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप सोनाळे,धिरज यादव,सारंग पाटील,सचिन माने,प्रविण गंड्रस,आकाश भुरे,किशोर गायकवाड,दिपक वारघडे,इरफान शेख,राहुल येरावार,भुजंग भाकरे आदी खेळाडूंनी प्रयत्न केले.

Share

Other News

ताज्या बातम्या