नांदेडमध्ये २६ नोव्हेंबरला रोजगार मेळावा; युवकांना नोकरीची संधी;शासकीय तंत्रनिकेतन व जिल्हा कौशल्य विकास केंद्राचा संयुक्त पुढाकार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/11/2026 7:01 AM

नांदेड : जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर 2026 रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह’ (जागेवर निवड संधी) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात विविध नामांकित खासगी आस्थापनांमधील रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड येथे उपस्थित राहून या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. नागेश एल. जानराव यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा. राहुल गेडेकर किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर, नांदेड येथे संपर्क साधावा.

Share

Other News

ताज्या बातम्या