आगामी पावसाळ्यात आलिशान कॉलनी,परिवार कॉलनी,जयहिंद कॉलनी, अहद कॉलनी, लाडले मशायक कॉलनी, अमन कॉलनी सोबत अन्य विस्तारित भागात निर्माण होणाऱ्या नागरी समस्यावर पावसापूर्वी उपाययोजना कराव्यात यासाठी राष्ट्रवादी पक्ष,कुपवाड शहर च्या वतीने सां.मि.कु.महानगरपालिका कुपवाड प्रभागात निवेदन देण्यात आले.
यावेळी कुपवाड शहर कार्याध्यक्ष अरुण तात्या रूपनर,अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष दाऊद भाई मुजावर,कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोतरे,जाफर मुजावर,अल्पसंख्यांक विभाग कुपवाड शहर अध्यक्ष निहाल मुजावर, कुपवाड शहर युवक अध्यक्ष दादासो कोळेकर आणि वरील भागातील नागरिक उपस्थित होते.