जनसेविका रोहिणी ताई वाघ यांना राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्काराने सन्मानित
चांदवड तालुक्यातील रोहिणी ताई अशोक वाघ यांना मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संविधान हक्क समिती व मंत्रालय वार्ता या संस्थेच्या वतीने भारताचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब व माजी मंत्री तथा खासदार चंद्रकांत हांडोरे, महेश तपासे, सुप्रसिद्ध गायिका निशाताई भगत, मंत्रालयीन संपादक अनिल अहिरे यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्कार देऊन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सरचिटणीस, जनसेविका रोहिणी ताई वाघ यांना सन्मानित करण्यात आले.
याकारणाने सामाजिक चळवळीतील नेते, नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत, जनसेविका सारिकाताई नागरे, सविताताई आहेर, किर्तीताई उदावंत, समिरभाऊ भडांगे, अविनाश वाघ यांनी रोहिणीताई वाघ यांचे विशेष अभिनंदन केले.
दरवर्षी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संविधान हक्क परिषद व मंत्रालय वार्ता या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना समाजभूषण महिला भूषण असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्यापैकी जनसेविका रोहिणीताई वाघ ह्या यावर्षीच्या मानकरी ठरल्या,
कुठलेही पाठबळ नसताना त्या समाजकार्य करत राहतात, जेवढे येईल तेवढी धडपड करत राहतात आणि मनात एकच स्वप्न की आपण जे वाईट दिवस काढले ते कुणालाही येऊ नये यासाठी त्यांची धडपड चालू असते आणि समाजसेवा हा आमचा एक छंद आहे निस्वार्थपणे एखाद्याच्या मदतीला धावून जातो, सर्वांना आपलं म्हणतो पण आपला विचार कोण करत नाही, पण हा माझा गैरसमज होता.
खरं काम करणाऱ्याला आणि प्रामाणिकपणे राहणाऱ्याला एक दिवस त्याचं फळ मिळतं ते मला आज मिळालं माझ्या कामाची दखल घेणारे माझी सुप्रसिद्ध गायिका निशाताई भगत आणि मंत्रालयीन संपादक अनिल साहेब अहिरे यांनी खरंच माझ्या कामाची दखल घेऊन मला मंत्रालयीन महिला भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले यापुढेही रोहिणी वाघ निस्वार्थपणे समाजकार्य करतील असे त्यांनी आश्वासन दिले 🙏