*पद्मभूषण अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास, लातूर तालुका शाखेने शंभर गरजु महिलांना मोफत धान्य वाटप केले*

  • Rameshwar Suryawansh (Latur)
  • Upadted: 30/03/2025 1:59 PM

लातूर - पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास संघटने च्या वतीने रमजान ईद आणि गुढी पाडवा या सणा निमित्ताने लातूर तालुका अध्यक्ष श्री असलम शेख, लातूर तालुका कार्याध्यक्ष अनिकेत वलांडे , रुकनोद्दीन पटेल, यांच्या सहकार्याने गरजु व गरीब महिलांना मोफत धान्य वाटप करण्यात आले आणि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर न्यास चे जिल्हाध्यक्ष प्रा. तात्यासाहेब नंदवे, आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यास चे जिल्हा सचिव रामेश्वर बाबुराव हे उपस्थित होते तर स्वागत अध्यक्ष म्हणून न्यास चे जिल्हा संपर्क प्रमुख लक्ष्मण गोरे यांच्यासह डॉ. धिरज तोष्णीवाल, शरद भोसले, राजेंद्र दुवे, कमलाकर शिंदे, आदींनी परिश्रम घेतले आणि एकूण शंभर गरजु महिला मोफत धान्य वाटप करण्यात आले यावेळी न्यास चे औसा तालुकाध्यक्ष प्रा. एन.जी.माळी यांनी आभार व्यक्त करून पुढील कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आणि उपक्रम राबविण्यात खरी समाजसेवा असल्याचे मत व्यक्त केले

Share

Other News

ताज्या बातम्या