उन्हाळी रेल्वे गाड्यांना कर्नाटकच्या बेळगाव जिल्हात 6 स्टेशनवर थांबे
पण महाराष्ट्रात सांगली जिल्हात फक्त 2 थांबे
प्रवासी हैराण....
किर्लोस्करवाडी व भिलवडी येथे त्वरीत उन्हाळी गाड्यांना थांबा देण्याची विनंती.....
बेंगलोर-मुंबई एक्सप्रेस व बेंगलोर-भगतकीकोठी एक्सप्रेस या गाड्यांना कर्नाटकात भरपूर थांबे दिले पण मध्य रेल्वेने महार्षंट्रात खूप कमी थांबे दिले.....
जेवहा कुठलीही नविन रेल्वे गाडी सुरु होते त्यावेळी मध्य रेल्वेला स्बतःच्या क्षेत्रातील थांबे देण्याचा पूर्ण अधिकार असतो. पण काही मनमानी वरिष्ठ अधिकारी भिलवडी व किर्लोस्करवाडी या महत्वपूरण स्टेशनवर थांबा देत नाहीत.
त्यामुळे रेल्वे स्टेशन असून देखील महाराषंट्रातील प्रवासी रेल्वे सेवेपासून वंचित रहात आहेत.
जिल्हातील रेल्वे प्रवासी संघटनांनी व सांगली जिल्हा नागरिक जाग्रुती मंचचे अध्यक्ष श्री सतीश साखळकर यांनी मध्य रेल्वेला आवाहन केले आहे की सर्व उन्हाळी गाड्यांना भिलवडी व किर्लोस्करवीडी थांबा द्यावा.व प्रवाशांचे हाल बंद करावे.