विकास नवाळे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद, निवृत्तीराव अरिंगळे

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 31/03/2025 2:30 PM

विकास नवाळे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद, निवृत्तीराव अरिंगळे                                    भगूर, ओसाड भागात पुस्तकांची बाग निर्माण करणारे विकास नवाळे यांचे शासकीय कार्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन व्यापारी सह. बँकेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष जेष्ठ नेते निवृत्तीराव अरिंगळे यांनी केले, भगूर च्या 'विराम 'फॉउंडेशन च्या वतीने संभाजी नगर महानगर पालिका उपायुक्त म्हणून निवड झालेले व शासनाचे पुरस्कार विजेते विकास नवाळे यांचा सत्कार नुकताच आनंदवन मिसळ येथे संपन्न झाला त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त, पोलीस उपाधीक्षक रमेश पवार,हे होते, व्यासपीठावर मुबंई गुन्हे शाखा उपायुक्त शामराव शिंदे आदी उपस्थित होते, प्रारंभी गुणवंत कामगार प्रशांत कापसे यांनी प्रास्तविक केले, या प्रसंगी सार्वजनिक वाचनालय कार्याध्यक्ष संजय करंजकर, व नाट्यगृह सचिव गणेश बर्वे यांचा ही सत्कार करण्यात आला. प्रसंगी ऊ. बा. ठा. शहर प्रमुख काकासाहेब देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तानाजी करंजकर, बांधकाम व्यवसायिक दीपक बलकवडे, नासाका बचाव समिती अध्यक्ष विलास गायधनी, मेडिकल असोसिएशन चे सुभाष शिंदे, महापौर केसरी पहिलवान ग्रुप अध्यक्ष प्रवीण पाळदे,, व्यापारी बँक संचालक मनोहर कोरडे, बाबा सदाफुले, श्रीराम गायकkapपत्रकार विलास भालेराव, भारत चव्हाण व मित्र परिवार उपस्थित होते, विकास नवाळे यांनी सत्कारास उत्तर देतांना सांगितले की शासकीय काम करतांना जनतेच्या भावना लक्षात घेऊन कार्य केले तर कोणतीही अडचण येत नाही आपले काम प्रामाणिक पणे व पारदर्शक केल्यास जनता आपल्याला साथ देते, म्हणूनच जनतेला काय पाहिजे हे ओळखून अधिकारी वर्गाने काम करावे असे सांगितले, शेवटी प्रशांत कापसे यांनी आभार मानले

Share

Other News

ताज्या बातम्या