रविवार दि 30 रोजी गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर रविंद्र केंपवाडे यांच्या आर. के. ग्रुपच्या वतीने तयार करण्यात आलेल्या बबलू हत्तीच्या प्रतिकृतीचे त्रिमुर्ती कॉलनी, १०० फुटी रीक्षा स्टॉप चौकात लोकार्पण करण्यात आले. हा लोकार्पण सोहळा सुर्दशन न्युज चॅनल प्रमुख चव्हाणके साहेब, मा आमदार गोपीचंद पडळकर, हिंदू एकता आंदोलन चे प्रमुख मा. आमदार नितिन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक, १०० फुटी रिक्षा स्टाफ पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिलावर्गाची उपस्थीती होती.