सांगलीत कृष्णा नदी स्वच्छता अभियानात डॉल्फिन नेचर ग्रुपने उत्स्फूर्त सहभाग घेतला. पर्यावरण रक्षणासाठी गेली 25 वर्षे कार्यरत असलेल्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत ऐनापुरे सर,संस्थेचे सचिव आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देणारी लहान मुले ही या अभियानात विशेषतः सहभागी झाली.
या बालगोपाळांचा आजचा सहभाग कृष्णामाईच्या स्वच्छ व सुंदर भविष्यासाठी नवी आशा निर्माण करणारा आहे.
सांगलीकरांनो, आपणही आपल्या मुलांना घेऊन या पवित्र कार्यात सहभागी व्हा. त्यांच्यात स्वच्छतेचे संस्कार रुजवा आणि त्यांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून द्या.
आपल्या एकत्रित प्रयत्नांमुळेच कृष्णामाई पुन्हा एकदा निर्मळ आणि सुंदर होईल..!
राकेश दड्डणावर
संस्थापक निर्धार फौंडेशन 9922101262
@followers @highlight