मनपाचा संवाद व तक्रार निवारण कार्यक्रम, बुधवारी प्रभाग निहाय तर गुरुवारी आयुक्त स्वःता तक्रार निवारण करणार...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/04/2025 9:56 PM

मा. रविकांत अडसूळ आयुक्त यांनी
माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत
नागरिक संवाद आणि तक्रार  निवारण  मोहीम आयोजित केली आहे.

बुधवार एक दिवस प्रभाग निहाय तर एक गुरुवार मनपा स्तरावर मा आयुक्त स्वतः घेणार आहेत.

आज प्रभाग समिती क्र 2 मध्ये उप आयुक्त वैभव साबळे  यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ प्रज्ञा त्रिभुवन सहा आयुक्त यांच्या उपस्थितीत नागरिक संवाद आणि तक्रार  निवारण  मोहीम २ तक्रारी प्राप्त झाला होता त्यावर निर्णय घेतला आहे. सबधितांना सूचना दिल्या आहेत.

प्रभाग समिती क्र 3 मध्ये उप आयुक्त स्मूर्ती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन  सांगावकर सहा आयुक्त यांच्या उपस्थितीत नागरिक संवाद आणि तक्रार  निवारण  मोहीम ९ तक्रारी प्राप्त झाला होता  त्या पैकी ७  निकाली काढल्या आहेत उर्वरित २ त्यावर निर्णय घेतला आहे. सबधितांना सूचना दिल्या आहेत.

प्रभाग समिती क्र 4 मध्ये उप आयुक्त विजया  यादव   यांच्या मार्गदर्शनाखाली अनिस मुल्ला सहा आयुक्त यांच्या उपस्थितीत नागरिक संवाद आणि तक्रार  निवारण  मोहीम ४ तक्रारी प्राप्त झाला होता त्यावर निर्णय घेतला आहे. सबधितांना सूचना दिल्या आहेत.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत नागरिकांना बऱ्याच वेळा त्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय तसेच प्रभाग समिती मधील क्षेत्रीय कार्यालय व मनपाचे विविध विभाग या ठिकाणी भेटी द्याव्या लागतात.

त्यावेळी बरेच वरिष्ठ अधिकारी यांची भेट न झाल्यामुळे नागरिकांच्या तक्रारीचे निरसन होत नाही. अशा सर्वसाधारण तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी नागरिकांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट संवाद साधून नागरिकांच्या तक्रार निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून नागरिक संवाद व तक्रार निवारण हा उपक्रम महानगरपालिके मार्फत राबविण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.

 उपक्रमाचे स्वरूप

१. सदर उपक्रमांतर्गत खाली नमूद केल्यानुसार वरिष्ठ अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत सर्व संबंधित अधिकारी हे नमूद केलेल्या दिवशी व वेळी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या समक्ष संवाद साधून जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न करतील.

२. प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन त्याचा पाठपुरावा प्राधान्याने केला जाईल. महानगरपालिकेच्या संगणकीय सॉफ्टवेअर मध्ये नोंदी घेतल्या जातील.

३. या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारी सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. गरजेनुसार लेखी पत्रव्यवहार करून कळवले जाईल.

या तक्रारीच्या नोंदी बाबत व तक्रार निर्गतीच्या सद्यस्थिती बाबत नागरिकांना मोबाईलवर मेसेज द्वारे कळविण्यात येईल.

मा रविकांत अडसूळ आयुक्त यांनी  नागरिकांच्या तक्रारी या सत्वर निकाली काढण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेऊन अमंलबजावणी करण्यात येत आहे. 
मा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली देखील नागरिक संवाद आणि तक्रार निवारण मोहीम राबविण्यात येणार आहे , तरी नागरिकांनी आपली तक्रार निवारण साठी प्रशासनाशी  संवाद साधावा अशी विनंती केली आहे.


Share

Other News

ताज्या बातम्या