मिरजेत जपली गेली सामाजिक बांधिलकी, ईद- निमित्त गरजु मुस्लीम विध्यार्थिनींना दिली लॅपटॉप ची " इददी "...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/04/2025 11:55 AM

देशात सर्वत्र सामाजिक विषमता शिगेला पोहचलेले असताना मिरजेत ऍड. अजिंक्य कुलकर्णी यांनी ईदचे निमित्त साधून एका गरजू विद्यार्थीनीला लॅपटॉप देत ईदची "इद्दी" भेट देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

शहरातील अक्सा खालिद मुरसल ही विद्यार्थीनी विलिंग्डन कॉलेज येथे शिकण्यास आहे. तिच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. अक्सा ही आपली विधवा आई, एक लहान बहीण आणि भाऊ हिच्या सोबत राहण्यास आहे.
अक्सा हिला आर्टिफिशियल इंटेलिजेंस हा कोर्स करायचं असल्याने तिला लॅपटॉपची गरज होती. मात्र, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती महागडा लॅपटॉप विकत घेऊ शकत नसल्याने पुढील शिक्षण थांबले होते.
ही बाब मिरज सुधार समितीचे जहिर मुजावर यांनी सामाजिक कार्यकर्ते ऍड. अजिंक्य कुलकर्णी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ऍड. कुलकर्णी यांनी ईदचे औचित्य साधून भाजप जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे-म्हैशाळकर यांच्या हस्ते अक्सा हिला ईदची "इद्दी" म्हणून लॅपटॉप भेट देत सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, डॉ. भालचंद्र साठ्ये, जहिर मुजावर उपस्थितीत होते. ऍड. अजिंक्य कुलकर्णी यांनी राबविलेल्या या सामाजिक बांधिलकी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या