आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सोलापूर दि:ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा.श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांनी सपत्नीक अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन व आशीर्वाद घेऊन सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना केली.
यावेळी त्यांनी “धर्म, संस्कृती आणि परंपरा जपण्यात वटवृक्ष देवस्थान राज्यात अग्रेसर आहे,” असे गौरवोद्गार काढले. तसेच पालकमंत्री म्हणून लोकसेवा करण्यासाठी स्वामींचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे, ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, हा ऊर्जादायी मंत्र स्वामी महाराजांनी आपल्याला दिला, जो सदैव प्रेरणेचा स्त्रोत म्हणून साथ देतो.
मंदिर समितीतर्फे पालकमंत्री जयकुमार गोरे व त्यांच्या पत्नी सौ.सोनिया गोरे यांचा कृपावस्त्र, प्रसाद आणि श्रींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
समाजसेवेचा दीपस्तंभ ठरलेले अन्नछत्र मंडळ – पालकमंत्री गोरे यांची प्रशंसा
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास भेट देऊन संस्थेच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
त्यांनी अन्नछत्र मंडळ हे श्रद्धा, संस्कार आणि समाजसेवेचा दीपस्तंभ आहे असे म्हणत तालुक्यातील ७७ कुस्तीगीरांसाठी देण्यात येणाऱ्या पोषणखुराक योजनेसह दिव्यांग आणि निराधारांसाठी सुरू असलेल्या महाप्रसाद सेवेचे विशेष कौतुक केल.
यावेळी अक्कलकोटचे आमदार श्री.सचिनदादा कल्याणशेट्टी महेश इंगळे, महेश हिंडोळे,अमोलबापू शिंदे, शहाजी पवार, आनंदराव तानवडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.