पद्मभूषण डॉ.अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास, लातूर च्या शहर जिल्हाध्यक्ष लातूर पदी श्री सचिन प्रभाकर अंकुलगे यांची निवड

  • Rameshwar Suryawansh (Latur)
  • Upadted: 31/03/2025 1:14 AM

दिनांक 29/03/25
लातूर - पद्मभूषण डॉ. अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन  न्यासाच्या संघटनेत कार्यकर्ता म्हणून आपण कार्य करण्याचे ठरवले आहे. एका बाजूला गांधीजींच्या स्वप्नातील बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास आणि दुसऱ्या बाजूला गाव, समाज आणि देशाच्या विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची गळती रोखणे ही उद्दिष्ट्ये घेऊन लोक आंदोलन न्यासाचे कार्य सुरू आहे. सबंध महाराष्ट्रात अण्णा हजारे यांच्या सानिध्यातील व विविध प्रकारच्या क्षेत्रातील 
कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार महाराष्ट्र राज्यात संघटन बांधणी करण्याचा निर्णय न्यासाने घेतला आहे. त्यासाठी 27 सप्टेंबर 2024 रोजी विश्वस्तांची बैठक झाली. त्यावेळी झालेल्या निर्णयानुसार आपणास जिल्हा स्तरावरील संघटनाची जबाबदारी देत आहोत. आढावा बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आपली पूढील एक वर्षांसाठी लातूर जिल्ह्याचे लोक आंदोलन न्यासाचे लातूर जिल्हा शहराध्यक्ष  म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. तरी आपण हे पत्र मिळताच या पदाचा कार्यभार स्विकारून जिल्ह्यात संघटनेचे काम सुरू करावे. या नियुक्तीबद्दल  न्यासाच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले सदर नियुक्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला या नियुक्ती पत्रावर प्रा.तात्यासाहेब नांदवे जिल्हाध्यक्ष लातूर व जिल्हा सचिव रामेश्वर बाबुराव सुर्यवंशी यांनी स्वाक्षरी करून स्वहस्ते नियुक्त पत्र दिले आहे यावेळी चंद्रकांत कासले जिल्हा उपाध्यक्ष,लक्ष्मण गोरे जिल्हा संपर्क प्रमुख, ॲड नारायण सोमवंशी जिल्हा कार्याध्यक्ष, डॉ.धीरज तोष्णीवाल सह कार्याध्यक्ष,शरद भोसले जिल्हा सहसचिव, राजेंद्र दुवे जिल्हा संघटक 1, अरविंद शिंदे जिल्ह संघटक 2, मोहन माळी तालुका अध्यक्ष औसा, माधव बांडे तालुका अध्यक्ष रेणापूर, असलम शेख तालुका अध्यक्ष लातूर, अनिकेत वलांडे तालुका कार्याध्यक्ष लातूर, सुधीर पुरी तालुका अध्यक्ष निलंगा,आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या