कंत्राटदारांनी थकलेल्या बिलामुळे शासनाचा निषेध नोंदविला
गडचिरोली :- आदिवासी बहुल आणि मागासलेला अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून विविध योजनेच्या माध्यमातून विकासात्मक कामे करण्याकरिता कामे वाटप करण्यात आली
बहुतेक कंत्राटदारांनी सदर कामे विहित मुदतीत पूर्ण देखील केली परंतु सदर कामांचा निधी शासनाकडून न आल्यामुळे आता जिल्ह्यातील कंत्राटदार कर्जबाजारी झाले असल्याचे दिसून येत आहे
कंत्राटदारांनी दिलेल्या माहिती प्रमाणे या सरत्या आर्थिक वर्षात 1150 कोटी पैकी फक्त 28 कोटींची निधी पाठविल्यामुळे कंत्राटदार हे आक्रमक झाले व त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग येथे जाऊन नाराजी व्यक्त केली व शासनाविरोधात घोषणाबाजी सुद्धा केली.