भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने भगूर येथे हिंदुत्वाचे गुढी उभारण्यात आली
भगूर येथील भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर सावरकर समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर मूर्ती जवळ हिंदुत्वाची गुढी उभारुन हिंदू नववर्षांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. यावेळी संभाजी देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सुनिल जोरे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला, प्रसंगी सौं अंजली मरकड व रोहिणी कुवर यांनी गुढीची भक्तीभावे पुजा करून वंदन केले. सुत्रसंचलन करतांना मनोज कुवर यांनी यावेळी कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदुसंघटक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदू संघटन हे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येतो, समुहाच्या वतीने तेरा वर्षांपासून दरवर्षी हिंदुत्वाची गुढी सावरकरांच्या मूर्ती शेजारी उभारण्यात येते असे सांगितले, तसेच प्रसंगी भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो असे जयघोष करीत परिसर दणाणून गेला होता, या वेळी समूहाचे योगेश बुरके, प्रशांत लोया, मंगेश मरकड, संदेश बुरके,दिगंबर करंजकर, तानाजी करंजकर, विक्रम सोनवणे, प्रमोद घुमरे, गणेश कुवर, ओम देशमुख, शेखर जाधव, दिपक गायकवाड, निलेश हासे, संस्कार मरकड, साई देशमुख आदि उपस्थित होते.