संजयनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्ताची भाजप नेते दिपक माने यांचे निवेदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/04/2025 3:40 PM

 प्रभाग क्रमांक 11 हा सांगली शहरातील मोठा विस्तारीत भाग आहे. येथील नागरिक बरेच  नागरी समस्येने त्रस्त आहेत.प्रभागात मोठया प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या भटके कुत्र्यांच्याकडुन लहान मुले, नागरिक यांच्यावर वांरवार हल्ले होत आहेत. तरी ती भटकी कुत्री लवकर पकडण्यात यावेत. त्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. प्रभागा मध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. औषधाची फवारणी नियमीत होत नाही ती करण्यात यावी. यासाठी भाजप नेते दिपक माने यांनी  आयुक्त रविकांत आडसुळ यांना निवेदन देऊन मागणी केली. आयुक्त आडसुळ यांनी तात्काळ दखल घेऊन सांगली  मिरज कुपवाड महापालिका हद्दीत  भटके कुत्री पकडण्याची विशेष मोहीम आखणार असल्याची सांगितले  व त्याची सुरवात प्रभाग क्रमांक 11 संजयनगर पासुन करण्याची ग्वाही दिली. व प्रभाग 11 मधील ईतरही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

Share

Other News

ताज्या बातम्या