प्रशांत कापसे यांना सामाजिक कार्य पुरस्कार

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 02/04/2025 4:21 PM

प्रशांत कापसे यांना सामाजिक कार्य पुरस्कार                           

 भगूरच्या सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे प्रेस कामगार नेते व गुणवंत कामगार प्रशांत कापसे यांना नाशिक च्या बाबाज थिएटर्स च्या रौप्य मोहोत्सवनिमित्त सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल नाशिक ग्रामीण चे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या शुभहस्ते, स्मृतिचिन्ह, शाल बुके देऊन गौरवीण्यात आले,प्रमुख अतिथी म्हणून भालचंद्र आंगृहतकर, हे होते, प्रारंभी बाबाज थिएटर्स चे संचालक प्रशांत जुन्नरे यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रमास सौ, विद्या कापसे, आदित्य कापसे, सार्वजनिक वाचनालय कार्याध्यक्ष संजय करंजकर, गणेश बर्वे, सोमनाथ मुठाळ, सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक रमेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते, गंगापूर रोड येथील कृतकोटी शंकराचार्य हॉल मध्ये हा समारंभ संपन्न झाला, त्यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल, माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे, व्यापारी बँक व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवृत्ती महाराज अरिंगळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तानाजी करंजकर, ठाणे पोलीस उपायुक्त शेखर बागडे, मुंबई गुन्हे उपायुक्त शामराव शिंदे, उद्योजक उत्तमराव शिंदे आर, टी, ओ ऑफिसर उत्तमराव जाधव, कामगार नेते जयंत गाडेकर, भा. ज. प नेते गिरीश पालवे, भा. ज. प युवा मोर्चा सेक्रेटरी प्रशांत वाघ,, ऊ बा. ठा शहर प्रमुख काकासाहेब देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या