महापालिका आयुक्त रविकांत अडसूळ यांनी जनतेच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. दर गुरुवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत आयुक्त स्वतः जनसंवाद साधून जागेवरच नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच, दर बुधवारी मिरज कुंपवाड भागातही जनसंवाद तक्रार निवारण कार्यक्रम होणार आहे.
याशिवाय, दिव्यांग सक्षमीकरणासाठी विशेष शिबिर आयोजित करून दिव्यांग बांधवांना महापालिकेकडून विविध सवलती दिल्या जाणार आहेत.
या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी *लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे* यांच्या हस्ते आयुक्त रविकांत अडसूळ यांचे स्वागत करण्यात आले.