भुकेले मूल, विझलेली चूल आणि जनतेची दिशाभूल...यांच्यासाठी लढल्याने तुम्ही सोने व्हाल! - नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा मनमानी कारभार, मनमाड नगरपालिकेतील भोंगळ कारभार, निफाड तालुक्यातील रौळस, रौळस पिंप्री व चांदवड तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायतीत चालू असलेला भ्रष्टाचार, अत्याचाराच्या जनतेच्या आलेल्या तक्रारी घेऊन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे शिष्टमंडळ नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने पोहोचले.
यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस, नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत, महिला प्रदेश सरचिटणीस रोहिणीताई वाघ, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष कल्पनाताई दोंदे, नाशिक जिल्हाध्यक्ष, ओबीसी प्रदेश प्रमुख कुंदाताई पवार, नाशिक जिल्हाध्यक्ष रेखाताई निकुंभ, नाशिक तालुकाध्यक्ष सविताताई आहेर, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रमेशजी चेवले, शहर उपाध्यक्ष सुवर्णाताई उदावंत, शहरप्रमुख जावेदभाई शेख, तालुकाध्यक्ष बिस्मिल्ला खान, नाशिक (क) अध्यक्ष संजय बलकवडे, शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ, नाशिक सचिव पद्माकर भालेराव, भगूर देवळाली उपाध्यक्ष तुकाराम हांडगे, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, कार्याध्यक्ष श्याम डावरे, श्री रवींद्र जैन, श्री शुभम दोंदे, श्री सुधाकर कटारे, चंद्रकांत काळे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा प्रशासकीय मान्यवरांना हाताशी धरून सरकारी, निमसरकारी संस्था असल्याचा बनाव करून बेहिशेबी भ्रष्टाचाराचा प्रकार नाशिक मध्ये दिसुन आला आहे, सदर ग्राउंड साठी पुनर्निविदा काढून जास्त महसूल देणाऱ्या किंवा मनपा ने ठरवलेल्या दरात देण्यात यावे.
यांनी आजतागायत 32 वर्षांपासून सदर ग्राउंडवर बेकायदेशीर कब्जा व अतिक्रमण तसेच खेळाडू, त्यांचे पालक व नाशिककर नागरिक यांची आर्थिक पिळवणूक व फसवणूक केलेली आहे तसेच लाखो करोडो रुपयांचा अपहार केलेला आहे आणि मनपा ला कोणताही महसूल दिलेला नाही (तसे माहिती आधारखाली मागितलेल्या माहिती द्वारे प्रशासनाने कळविले आहे)
वरील न्यायक व नाशिककर नागरिक व सरकारी, मनपा महसूल याच्या हितार्थ असलेल्या मागण्या यावर त्वरित विचार करावा व संबंधित संस्था यांची मान्यता रद्द करावी व चौकशीअंती दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर विविध कायदेशीर कलामांअंतर्गत फौजदारी कारवाई करावी.
मनमाड नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांकडून, अगोदर गोशाळेसाठी मान्यता देवून दोंदे दाम्पत्यांना हेतुपुरस्सर उडवाउडवीचे उत्तरे देवून जाणिवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे.
निफाड तालुक्यात रौळस व रौळस पिंप्री या गावामध्ये सरपंच व ग्रामसेवकांचा मनमानी कारभार, वास्तवात काम मात्र शुन्य, चांदवड तालुक्यातील दहेगाव येथे डुप्लिकेट सरपंचांची दादागिरी व अत्याचार नागरिकांची कुणीही दखल घेत नाही.
आपण सदर परिसरातील पिडीत नागरिकांना योग्य त्या प्रशासकीय सुविधा तात्काळ द्याव्यात, तसे न झाल्यास अखिल भारतीय भ्रस्टाचार निर्मूलन संघर्ष समिती कायदेशीररित्या लोक आंदोलन, मोर्चे व आमरण उपोषणाद्वारे याचा पाठपुरावा करीत राहील तसेच त्यामुळे जर कायदा सुव्यवस्था यांस बाधा झाल्यास, आल्यास प्रशाशन सर्वस्वी जवाबदार राहील.