न्यु प्रायमरी स्कूल कुपवाड शाळेत इ ७ वीचा निरोप समारंभ संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/03/2025 7:01 PM

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड, संचलित न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड मधील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा व निरोप समारंभ संपन्न झाला .
       कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव बालक मंदिर चे सहा. शिक्षक श्री नितेंद्र जाधव सर उपस्थित राहिले     .   
      प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुंदन जमदाडे  सरांनी प्रास्ताविक भाषणातुन पाहुण्यांची ओळख करून दिली.नंतर इयत्ता 7वी च्या विद्यार्थ्यांना  परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.इयत्ता 6वी. च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता सातवीच्या निरोप समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त केले. 7वी.च्या  विद्यार्थ्यांनी बालपणापासूनच्या शाळेतील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.  तसेच शाळेचे पर्यवेक्षक श्री. अनिल शिंदे सर  आणि सौ. हेमलता धोतरे मॅडम व श्रीमती . ज्योती पाटील मॅडम यांनी मुलांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.   
          प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात मुलांना  शिक्षणाचे महत्व तसेच शिक्षणासाठीच्या विविध संधी, शैक्षणिक क्षेत्रे इ.माहिती सांगत परीक्षेला शुभेच्छा दिल्या. नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. आण्णासाहेब उपाध्ये सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
          सदर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक- शिक्षिका, विद्यार्थी- विध्यार्थिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि. मंथन ठोंबरे व चि. रितेश पुजारी यांनी केले  .

Share

Other News

ताज्या बातम्या