प्राथमिक विद्यामंदिर शाळेत पुस्तकांची गुढी उभारून गुढीपाडवा व रमजान ईद सण साजरा
भगूर येथील प्राथमिक विद्यामंदिर शाळेत विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने पुस्तकांची गुढी उभारून गुढीपाडवा व रमजान ईद सणा साजरा करण्यात आला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत काशीकर सर व भगूरचे जनसेवक कैलास भाऊ भोर उपस्थित होते हेमंत काशीकर सरांनी विद्यार्थ्यांना गुढीपाडवा सणाचे महत्त्व सांगितले व पाटील सर यांनी रमजान ईद सणाची महत्त्व सांगितले. सौ उषा आव्हाड मॅडम यांनी खंडग्रास सूर्यग्रहणाची घडण्याची भौगोलिक व वैज्ञानिक कारण विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र महाजन सर यांनी केले व आभार विजया चतुर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वंदना आडके. महेंद्र महाजन सर. विजया चतुर. सिसोदिया मॅडम. उषा आव्हाड मॅडम. इत्यादी शिक्षकांनी प्रयत्न केले