भुसावळ
भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात 2024-25 मधील शैक्षिणक, क्रीडा, संस्कृतिक, व इतर उपक्रम मधील गुणवंतप्राप्त विद्यार्थी यांना दिनांक 27 मार्च 2025 रोजी सकाळी 09.00 वाजता कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव येथील प्र-कुलगुरू प्रा डॉ एस टी इंगळे, तसेच प्रभारी अधिष्ठाता, सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक साहेबराव भुकन यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजू फालक समिती प्रमुख प्रा डॉ संजय चौधरी व्यासपीठावर उपस्थित उपस्थित होते
प्र. कुलगुरू डॉ एस टी इंगळे - विद्यार्थ्याने जिद्द, चिकाटी व सातत्य ठेवल्याने यश मिळते, अपयशाने खचून न जाता अपयश पचवण्यासाठी शक्ती वाढवावी त्यातूनच पुढे यश मिळते, एन इ पी 2020 नुसार विद्यापीठाने या वर्षापासून क्रीडा व संस्कृतिक विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करून मुख्यप्रवाहात आले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे सर्वांनी व्यक्तिमत्व विकास करिता सर्व उपक्रमात सहभागी व्हावे असे सांगितले
प्रा डॉ साहेबराव भुकन - शिक्षणाबरोबर विद्यार्थांनी कृतिशील राहायला पाहिजे त्यामुळे यश प्राप्त होते सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांचा आदर्श ठेवल्यास चालना मिळते, अभ्यासासोबत इतर कौशल्य आत्मसात करावे तसेच विविध उपक्रमात सहभागी व्हावे
प्राचार्य डॉ राजू फालक - विद्यार्थ्याने एक तरी चांगले काम केल्यास त्याच्या संबंधित सर्वांचा विकास होतो, सतत प्रयत्नाने यश मिळते त्यामुळे पारितोषीक मिळविण्यास मदत होते त्यामुळेच आपण सर्व येथे उपस्थित आहात, विद्यापीठाने कॉपीमुक्त अभियान राबवित आहे पुढील वर्गात प्रवेश पाहिजे असल्यास परीक्षा पास होणे आवश्यक आहे त्यामुळे पुन्हा पारितोषिक मिळेल ज्यांना पारितोषिक मिळाले त्यांचे अभिनंदन करतो ज्यांना मिळाले नाही त्यांना पुढील वर्षासाठी शुभेच्छा देतो असे सांगितले
यावेळी प्रस्तावना प्रा डॉ जयश्री सरोदे सूत्र संचालन प्रा डॉ डी एस राणे तर आभार प्रदर्शन प्रा डॉ माधुरी पाटील यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा श्रेया चौधरी, प्रा डॉ जगदीश चव्हाण, प्रा डॉ अनिल सावळे, प्रा एस डी चौधरी, प्रा. संगीता धर्माधिकारी, प्रा जागृती सरोदे, गायत्री नेमाडे, प्रा सुशीला भाटे, प्रा ऐश्वर्या वासकर प्रा निर्मला वानखेडे, प्रा डॉ संजय बाविस्कर, प्रा आर डी भोळे, प्रा डॉ आर बी ढाके,प्रा एस एस पाटील, प्रा डॉ अंजली पाटील, किरण पाटील, प्रमोद नारखेडे, सुधाकर चौधरी, प्रकाश चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर, यांनी कार्य केले असे समिती प्रमुख प्रा डॉ संजय चौधरी यांनी कळविले आहे