शेळकेवाडी येथे नविन व्यायामशाळा बांधकाम व्हावे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/03/2025 7:56 AM


सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत माध्यमातून एक गुंठा जागा उपलब्ध करून दिल्यास, आणि मा. सरपंच /ग्रामसेवक यांनी प्रस्ताव तयार करून दिल्यास ५००चौ.फु.चटई क्षेत्राचा हाॅल, प्रसाधनगृह, कार्यालय /भांडारगृह, या तिन बाबींचा स्वतंत्र समावेश आराखडय़ात आवश्यक आहे.
श्री. हनुमान मंदिर शेळकेवाडी येथे मंदिरासमोरच नविन व्यायामशाळा बांधकाम व्हावे असे ठरविण्यात आले. गुरुवार दि. २७/०३ /२०२५ रोजी सांय. ठिक. ८वा. शेळकेवाडी येथे ग्रामपंचायत हाॅल मध्ये ग्रामस्थ व तरूणांच्या मिटींग मध्ये, मा. रामदास उर्फ दादा सावंत जयहिंद गुंठेवारी सेना महाराष्ट्र राज्य नेते तथा ग्रामस्थ शेळकेवाडी यांनी हा विषय मांडला, यावेळी ग्रामस्थ व तरूण यांनी सर्वानी सर्वानुमते नविन व्यायामशाळा बांधकाम व्हावे या बाबत पाठींबा दिला, यावेळी सरपंच /उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य श्री. विलासराव साळुंखे, उपसरपंच यांचे चिरंजीव निलेश सावंत, श्री. दत्तात्रय साळुंखे, ऋषिकेश जगताप, पै.मेजर. चंद्रकांत उर्फ मोहन जगताप,श्री. सुनिल मोरे, मेजर श्री. संजय जगताप,वैभव जगताप, पृथ्वीराज उर्फ विठ्ठल जगताप, संतोष साळुंखे, पृथ्वीराज सावंत,सुरज जगताप, सुजल साळुंखे, ओमकार सावंत, सोमनाथ साळुंखे, महेश सावंत, आप्पासाहेब पवार, अदी ग्रामस्थ व तरूण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रा. पं. सदस्य श्री. विलासराव साळुंखे यांनी सांगितले की, आज जी मिटींग घेण्यात आली आहे ती ग्रामस्थ व तरूण मंडळी यांची आहे परंतु तुम्ही दोन दिवसात ग्रामस्थ व तरूण यांच्या वतीने लेखी अर्ज द्या की, श्री. हनुमान मंदिर समोर डाॅकरा शेड मध्ये गेले विस वर्षापासून तरुण व्यायाम करतात म्हणून तिथेच नविन व्यायामशाळा बांधकाम व्हावे, आम्ही ग्रामपंचायत तातडीने मिटींग घेऊन निर्णय घेऊ, आणि लवकरच प्रस्ताव सादर करू.

मा. रामदास सावंत

Share

Other News

ताज्या बातम्या