नांदेड : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश तृतीयपंथी प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारी डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या तृतीयपंथी प्रकोष्ठातील संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये मराठवाडा विभागाच्या सहसंयोजकपदी फरीदा बकश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपच्या तृतीयपंथी प्रकोष्ठाच्या प्रदेश संयोजकपदी मनिषा पुणेकर यांची निवड करण्यात आली असून, विविध विभागांच्या सहसंयोजकपदांसाठीही नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ठाणे-कोकण विभागातून छकुली बनसोडे, मराठवाड्यातून फरीदा बकश, पूर्व विदर्भातून राणी धवळे, पश्चिम विदर्भातून सिमरन अम्मा, पश्चिम महाराष्ट्रातून कादंबरी बनसोडे आणि उत्तर महाराष्ट्रातून शुभांगी शिंदे यांची सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्व नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. तृतीयपंथीय समाजाच्या विविध समस्या, हक्क आणि विकासाचे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून मांडणे, तसेच या समाजघटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटनात्मक स्तरावर काम करण्याची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
सामाजिक कार्याची दखल घेत महत्त्वाची जबाबदारी
फरीदा बकश या कमल फाउंडेशनचे श्री. अमरदीप गोधने यांच्या सहकार्याने विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. सामाजिक कार्यातील त्यांचा सहभाग आणि समाजासाठी सुरू असलेल्या उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर मराठवाडा सहसंयोजकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव; संत-महंतांचे आशीर्वाद
फरीदा बकश यांच्या नियुक्तीबद्दल श्री श्री श्री १००८ महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज, क्षेत्र माहूरगड,खासदार डॉ. अजितजी गोपछडे, आमदार श्रीजया चव्हाण, भारतीय जनता पार्टी उत्तर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. मंगाराणीताई आंबुलगेकर, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या दक्षिण जिल्हाध्यक्षा सौ. अनिताताई चोंडीकर, केंद्रीय सेन्सर बोर्ड सदस्य रुपेश पाटील भोकसखेडकर आणि नांदेड येथील गुरु श्री रंजीता नायक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील विविध भागांतील तृतीयपंथी समुदायाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि प्रदेश प्रभारी डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली फरीदा बकश मराठवाड्यात पक्षाचे संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मराठवाडा सहसंयोजकपदी निवड झाल्याबद्दल फरीदा बकश यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.