नांदेड : संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षाला समर्पित दुष्काळ चिंतन व संघर्ष परिषदेचे आयोजन रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदेड येथे करण्यात आले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणीटंचाई, जलव्यवस्थापन आणि ग्रामीण भागातील विविध समस्यांवर या परिषदेत सखोल चिंतन व चर्चा करण्यात येणार आहे.
ही परिषद सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड येथे पार पडणार आहे. या परिषदेला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री ॲड. मनोजभाऊ आखरे अध्यक्षस्थानी राहणार असून, प्रगतशील महिला शेतकरी शिवमती सविताताई मोरे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
परिषदेत प्रसिद्ध जलतज्ज्ञ शिवश्री डॉ. पुरुषोत्तम वायाळ, प्रगतशील शेतकरी शिवश्री कांतारावजी देशमुख आणि शिवश्री अमृतराव देशमुख हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते शिवश्री प्रविणदादा गायकवाड, महासचिव शिवश्री सौरभदादा खेडेकर आणि मुख्य प्रवक्ते शिवश्री प्रा. गंगाधर बनबरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यासोबतच संभाजी ब्रिगेडची सर्व राज्य कार्यकारिणी तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांची उपस्थिती राहणार आहे.
या परिषदेचे आयोजन संभाजी ब्रिगेड, नांदेड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले असून, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या वतीने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.