प्रभाग १८ मधील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन पाईपलाईन दाखल, नगरसेवक अभिजीत भोसले यांच्या पाठपुराव्याला यश

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/11/2026 9:46 PM


प्रभाग क्रमांक १८ मधील विविध भागांत गेल्या काही काळापासून पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा, कमी दाबाने पाणी येणे आणि जुन्या पाईपलाईनमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने प्रयत्न सुरू होते.
या प्रयत्नांना आता प्रत्यक्ष यश मिळत असून, आवश्यक नवीन पाईपलाईन आपल्या भागात दाखल झाल्या आहेत. आता संबंधित ठिकाणी पाईपलाईन टाकण्याची कामे हाती घेत आहोत.
📍 नवीन पाईपलाईन टाकण्याचे नियोजन असलेले भाग :
१. विठ्ठल नगर – महात्मा गांधी शाळेसमोरील मुख्य रस्ता :
पूर्वेकडे : भरत माने यांच्या घरापासून बन्ने फार्म हाऊसपर्यंत.
पश्चिमेकडे : हनमंत संगशेट्टी यांच्या घरापासून बन्ने फार्म हाऊसपर्यंत.
२. रामकृष्ण परमहंस सोसायटी – अंतर्गत दोन गल्ल्या.
३. १०० फुटी रोड ते पाटील किराणा स्टोअर्स – रामकृष्ण परमहंस सोसायटी परिसर.
४. महावीर पार्क व काबाज प्लॉट – रामकृष्ण परमहंस सोसायटी कमानीपासून महावीर पार्कच्या शेवटच्या गल्लीपर्यंत.
५. इनाम धामणीलगतचे महानगरपालिका क्षेत्र – कर्नाळे प्लॉटमधील दोन गल्ल्या.
६. शामराव नगर – अंतर्गत उपनगरातील पाच गल्ल्या.
या सर्व भागांतील पाणीपुरवठ्याच्या समस्या लक्षात घेऊन आवश्यक पाईपलाईनची कामे प्राधान्याने हाती घेत आहोत. उपलब्ध झालेल्या पाईपलाईन संबंधित ठिकाणी टाकण्यात येतील, तर उर्वरित पाईपलाईनदेखील लवकरच उपलब्ध होणार आहेत.
येत्या आठवडाभरात, जास्तीत जास्त दोन आठवड्यांत, नियोजित कामांना गती देऊन पाणीपुरवठ्याच्या जास्तीत जास्त अडचणी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
केवळ पाईपलाईन टाकून थांबायचे नाही, तर प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरळीत होतो का, शेवटच्या घरापर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचते का, याचीही संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्यावर भर राहील.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष काम महत्त्वाचे आहे.
आपल्या भागातील पाणीपुरवठ्याच्या अडचणी कायमस्वरूपी दूर व्हाव्यात, यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधून काम करत आहोत.
आपले सहकार्य आणि विश्वास असाच कायम राहू द्या.
आपला,
अभिजीत शकुंतला दत्तात्रय भोसले
नगरसेवक तथा सदस्य, स्थायी समिती
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका

Share

Other News

ताज्या बातम्या