राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य श्री रवि रामु कलोसे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक संपन्न;महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या स्थितीचा घेतला आढावा;सफाई कामागारांचे प्रश्न सोडणिसाठी समन्वय समितीची होणार स्थापणा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/11/2026 8:39 AM

नांदेड :  राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य सध्या नांदेड दौऱ्यावर असुन *आयोगाचे सदस्य श्री रवि रामु कलोसे* यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयात दिनांक २०.११.२०२६ रोजी बैठक पार पडली. या बैठकीत नांदेड महानगरपालिकेतील कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीचा आढावा आयोगाच्या सदस्यांनी घेतला. या बैठकीस *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अभिजित वायकोस, उपायुक्त नितीन गाढवे,* मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, मुख्य लेखापरीक्ष आनंद ऐनवाड, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, सफाई कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील इतर कार्यालयांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम राष्ट्रीय कर्मचारी आयोगाचे सदस्य श्री रवि रामु कलोसे यांचे मनपा आयुक्तांच्या हस्ते स्वागत करुन बैठकीस सुरुवात करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी उपआयुक्त नितीन गाढवे यांनी महानगरपालिकेतील कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सादरीकरण केले. ज्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात एकुण ०६ झोन असुन त्यातील २० प्रभागामध्ये संपुर्ण शहराच्या साफ-सफाईचे कामे कायम व कंत्राटदारामार्फत नेमलेल्या सफाई कामगारांमार्फत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या मंजुर आकृतीबंधानुसार सफाई कामगारांची एकुण मंजुर पदसंख्या ८०५ असुन त्यापैकी आजमितीस ५१८ कायम कामगार कार्यरत आहेत तर २८७ कायम सफाई कागारांची पदे रिक्त आहेत.त्याचप्रमाणे कंत्राटदारामार्फत एकुण ३२० सफाई कर्मचारी कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अमृत २.० योजने अंतर्गत शहरात मलनिस्सारण जोडणीचे प्रमाण ९८% असुन नांदेड शहरात Insanitary latrines नसल्याचे नमुद करण्यात आले. त्याचप्रमाणे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दित एकुण २३ सार्वजनिक शौचालय कार्यरत असुन सर्व शौचालय बी.ओ.टी. तत्वावर दिलेले आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त शहर उपक्रमात शहरातील ४३८८ पात्र लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधुन देण्यात आल्याची माहिती यावेळी पालिके मार्फत देण्यात आली.

पालिका हद्दीमध्ये हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांची सद्यस्थिती जाणुन घेतांना महापालिके मार्फत सन १९९७ पासुन जेटींग मशिनव्दारे साफसफाईचे काम केले जात होते. तसेच सद्य:स्थितीत जेटींग व गल्फर मशिनव्दारे साफसफाई केली जात असल्यामुळे शहरात हाताने मैला उचलला जात नसल्याचे पालिके मार्फत नमुद करण्यात आले.परंतु यथास्थिती एखाद्या कामगाराने सदरील काम करीत असल्याबाबत स्वयंघोषीत केल्यानंतर त्याची माहिती जिल्हा मॅन्युअल स्कैवेजिंग कमिटीकडे सादर करणे बंधनकारक असल्याचे आयोगाच्या सदस्यांनी स्पष्ट केले. तसेच समाज कल्याण विभागातील उपस्थित अधिकाऱ्यास जिल्हा मॅन्युअल स्कैवेजिंग समितीची स्थापणा करण्याबाबत निर्देश दिले. त्याचप्रमाणे हाताने मैला साफ करणाऱ्या कामागारांच्या पुनर्वसनासाठी शासनाने निश्चित केलेल्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार करावा अशी सुचना यावेळी आयोगाच्या सदस्यांनी केली. या प्रतिबंधित नियमांच्या अनुषंगाने सफाई कामगारांना अत्याधुनिक यंत्रसामुग्री हाताळणीसाठी वेळोवेळी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्याबाबत सुचित करण्यात आले.

सफाई कामगारांना वेळोवेळी भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालिका स्तरावर एक समन्वय समिती स्थापण करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्याचप्रमाणे “नमस्ते” योजनेचा लाभ सर्व सफाई कर्मचाऱ्यांना घेता यावा या दृष्टीकोणातुन या योजनेचा मोठ्या प्रमाणावार प्रचार व प्रसार करणे आवश्यक असल्याचे यावेळी नमुद करण्यात आले. नमस्ते योजनेअंतर्गत कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले असुन कामगारांना मास्क, गमबुट, हँन्डग्लोज इत्यादी सुरक्षा साहित्य उपलब्ध करुन देण्यात आल्याचे यावेळी पालिके मार्फत सांगण्यात आले.

महानगरपालिकेत महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना वारसा हक्काने नियुक्त्या दिल्या जातात.तसेच मनपा आस्थापनेवर स्थापनेपासुन सफाई कर्मचाऱ्यांना वाहन चालक, लिपीक, इत्यादी गट-क मधील पदावर पदोन्नत्या देण्यात येत असतात, लाड-पागे समितीची आजमितीची केवळ वारसांच्या अंतर्गत वादामुळे केवळ ०६ प्रकरणे प्रलंबित असुन मागील ०२ वर्षाच्या कालावधीत एकुण ९६ सफाई कामगारांना पदोन्नती देण्यात आल्याचे यावेळी उपायुक्तांनी सांगितले. याप्रसंगी लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार मनपा आस्थापनेवर नव्याने एकुण ०३ सफाई कामागारांच्या वारसांना सदस्य श्री रवि रामु कलोसे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.

महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करुन आरोग्य विषयक तपासण्या करुन उपचार केल्या जातात. तसेच महानगरपालिकेच्या सफाई कामागारांना मास्क, हँडग्लोज, एप्रॉन, नाली फावडा, टोपले, नारळी झाडु, रेनकोट, गमबूट इत्यादी स्वच्छता विषयक साहित्य देण्यात येते. त्याचप्रमाणे ड्रेनेज विभागा अंतर्गत वॉटरप्रुफ बुट, रिचार्जेबल बॅटरी, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी ग्लोज, सर्च लाईट, सेफ्टी गमशुट, नायलॉन लॉडर, नॉर्मल फेस मास्क, सेफ्टी हेल्मेट इत्यादी साहित्य पुरविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात सफाई आयोगाच्या सदस्यांनी विचारणा केली असता कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदाई केल्या जात असुन ईपीएफ व इएसआयसी, ५% घरभाडे भत्ता अदाई करण्यात येत असल्याचे मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच सफाई कामगारांना सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा आर्थ‍िक मोबदला सुध्दा दिल्या जातो असे नमुद करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजने अंतर्गत ८१ सफाई कामागारांना मोफत सदनिकेचा ताबा दिला असल्याचे यावेळी मनपाच्या वतीने सांगण्यात आले.

त्याचप्रमाणे पुनर्वसन योजने अंतर्गत महापालिकेमार्फत बांधण्यात आलेल्या दुकान गाळे / व्यापारी संकुलमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या आश्रितांसाठी शासन निर्णय दि.१२ जुन १९७९ अन्वये अनु.जाती/जमाती कोट्यातील १% गाळे राखीव ठेवणे क्रमप्राप्त असुन भविष्यात यांसदर्भात खबरदारी घेण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या तसेच कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यांना प्रसुती रजा, सेवा निवृत्त सफाई कारागारांचे लाभ, सुधारीत आश्वासित प्रगती योजना आदीचा लाभ देणे आवश्यक असल्याचे आयोगाच्या सदस्यांनी यावेळी सांगितले. एकंदरीत बैठकीच्या समारोपास आयोगाच्या सदस्यांनी महानगरपालिकेच्या काकाजावर समाधान व्यक्त करुन बैठकीची सांगता करण्यात आली.

Share

Other News

ताज्या बातम्या