अहिल्यानगर जिल्ह्यातील ST प्रवर्गातील मुलांसाठी पोलिस व सैन्यदल भरतीपूर्व मोफत प्रशिक्षणाची संधी!

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 18/11/2026 6:01 AM

निवासी सुविधा आणि भोजनासह चार महिन्यांचे प्रशिक्षण; अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ नोव्हेंबर

अहिल्यानगर : जिल्ह्यातील अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील युवकांसाठी पोलिस आणि सैन्यदल भरतीची तयारी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर यांच्या अंतर्गत पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी (ता. अकोले) येथे चार महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी असून, प्रशिक्षण कालावधी १ डिसेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ असा आहे. या प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना निवास आणि भोजनाची सुविधाही मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

कोणाला मिळणार संधी?

प्रशिक्षणासाठी उमेदवारांचे वय १८ ते २६ वर्षे, उंची किमान १६५ सेंटीमीटर आणि वजन किमान ५० किलो असणे आवश्यक आहे. उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा.

आवश्यक कागदपत्रे

  1. बारावी उत्तीर्ण गुणपत्रक
  2. शाळा सोडल्याचा दाखला
  3. जातीचा दाखला (ST)
  4. आधार कार्ड
  5. रहिवासी दाखला किंवा रेशन कार्ड
  6. डोमिसाईल दाखला
  7. चार पासपोर्ट साईज फोटो

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड एकूण १०० गुणांच्या परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

  • १६०० मीटर धावणे – ५० गुण
  • लेखी परीक्षा – ५० गुण

उमेदवारांची अंतिम निवड गुणवत्तेनुसार (मेरिट) केली जाणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ नोव्हेंबर

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑफलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज जमा करण्याचे ठिकाण : पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर.

परीक्षा कधी आणि कुठे होणार?

अर्ज केलेल्या उमेदवारांनी २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी येथे मूळ कागदपत्रे व त्यांच्या झेरॉक्स प्रतींसह उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी संपर्क

  • ९४२१५२५४१६
  • ८२७५३४९४१४
  • ९९६०११२६००

अहिल्यानगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र युवकांनी या मोफत प्रशिक्षण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती देवकन्या बोकडे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर यांनी केले आहे.


पत्रकार रवीकुमार शिंदे
संपादक – आपलं सत्य अहिल्यानगर
Executive Member – AIMA MEDIA
Ahilyanagar District, Maharashtra
All India Media Association
हिंदी मराठी पत्रकार संघ – तालुका संघटक
भारतीय पत्रकार अधिकार – महाराष्ट्र राज्य

आपलं सत्य अहिल्यानगर
विश्वसनीय • निष्पक्ष • तेज डिजिटल न्यूज

#Ahilyanagar #STTraining #PoliceBharti #ArmyBharti #FreeTraining

Share

Other News

ताज्या बातम्या