मेस्कोमध्ये सुरक्षा रक्षक पदासाठी माजी सैनिकांना संधी;इच्छुकांनी 10 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात नावे नोंदवावीत

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 04/11/2026 3:03 AM

नांदेड :.मेस्को (माजी सैनिक महामंडळ) क्षेत्रीय कार्यालय, लातूर अंतर्गत नांदेड जिल्ह्यात सुरक्षा रक्षक पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. या पदांसाठी माजी सैनिक, माजी सैनिकांचे पाल्य तसेच माजी सैनिकांच्या पत्नी व विधवा यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
नांदेड जिल्ह्यात सुरक्षा रक्षक पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी आपली नावे दिनांक 10 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे सादर करावीत. 
या भरती प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी पात्र माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी निर्धारित मुदतीत आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या