*अंतिम सामन्यात हिंदकेसरी स्पोर्ट्सचा पराभव; हर्षद शिंदे सर्वोत्कृष्ट खेळाडू, तर ओम पाटील यांना सर्वोत्कृष्ट संरक्षक पुरस्कार*
कुपवाड: मालगाव (ता. मिरज) येथे झालेल्या पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत कुपवाडच्या राणाप्रताप मंडळाच्या पुरुष संघाने दिमाखदार कामगिरी करीत जिल्हा अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात हिंदकेसरी स्पोर्ट्स, कवठेपिरान संघाचा पाच गुणांनी पराभव करीत राणाप्रताप मंडळाने विजेतेपद पटकावले. पुरुष गटातील मंडळाचे हे आतापर्यंतचे चौथे जिल्हा विजेतेपद ठरले.
स्पर्धेतील उपांत्य सामन्यात राणाप्रताप मंडळाने तिरंगा मंडळ, भडकंबे संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर अंतिम सामन्यात हिंदकेसरी स्पोर्ट्स, कवठेपिरान संघाविरुद्ध प्रभावी खेळाचे प्रदर्शन करीत पाच गुणांच्या फरकाने विजय मिळवला.
या स्पर्धेत राणाप्रताप मंडळाचा खेळाडू हर्षद शिंदे याला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा, तर ओम पाटील याला सर्वोत्कृष्ट संरक्षकाचा पुरस्कार मिळाला.
विजयी संघात अक्षय मासाळ, सौरभ घाडगे, अक्षय हरगे, बिरू बंगारी, साहिल वालकर, सागर गायकवाड, ओम पाटील, आयुष लाड, निखिल गायकवाड, रत्नम गौंडाजे, राकेश गावडे, हर्षद शिंदे, अथर्व लोकापुरे, अभिषेक चव्हाण व सार्थक हिरेकुर्ब यांचा समावेश होता. संघाला श्रीकांत कोळेकर यांनी मार्गदर्शन केले, तर प्रकाश शिंदे यांनी संघ व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली.
बक्षीस वितरण समारंभात मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, सतीश घारे, बल्लू पुजारी, फिरोज मुजावर, जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव डॉ. प्रशांत इनामदार, सहसचिव मारुती शहापुरे आदी मान्यवरांच्या हस्ते राणाप्रताप मंडळाच्या संघाला विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला.
राणाप्रताप संघाला
मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील,अजित पाटील,रमेश पाटील,प्रशिक्षक संतोष कर्नाळे, संजय हिरेकुर्ब, प्रा.सचिन चव्हाण, विशाल बन्ने, शिवसागर पाटील,मायाप्पा हिरेकुर्ब, काशिलिंग हिरेकुर्ब, मदन जाधव अक्षय यमगर,अजय पाडळे,महेंद्र पाटील, प्रा.विजय पाटील, विजय पाडळे,सागर नरदेकर, महेश कर्नाळे,अतुल पाटील, अनिल पाटील, शेखर स्वामी, राहुल गवळी,धनपाल आडमुठे, महावीर राजोबा, प्रमोद वालकर, शितल अकिवाटे,शितल कर्नाळे,अक्षय पाटील, धनंजय पाटील, तक्षक गौडाजे,सुनिल सुतार, अभिषेक कर्नाळे,निलेश पवार, अमोल पाटील, अभिजीत सुतार, शुभम पाटील, दिपक पाडळे,स्वप्नील पाटील, अनिल हिरेकुर्ब, पोपट नरदेकर,वासुदेव जमदाडे आंदिचे मार्गदर्शन मिळाले.