सरसकट कर्जमाफीसह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹५० हजार प्रोत्साहन अनुदान देण्याचीही मागणी
अहिल्यानगर : दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेली प्रत्येकी ₹५ हजारांची आर्थिक मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
याबाबत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन शेतकऱ्यांना जाहीर झालेली आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत शेतीचा वाढता खर्च, उत्पन्नातील घट आणि आर्थिक अडचणी यामुळे शेतकरी संकटाचा सामना करत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सणापूर्वी शासनाची मदत मिळणे आवश्यक असल्याचे पत्रातून नमूद करण्यात आले आहे.
यासोबतच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, तसेच नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना देण्यात येणारे ₹५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी आर्थिक अडचणींमध्ये जाऊ नये आणि शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
रवीकुमार शिंदे
माहिती अधिकार कार्यकर्ता | हिंदी मराठी पत्रकार संघ, तालुका संघटक
आपलं सत्य अहिल्यानगर — संपादक
#दुष्काळी_मदत #शेतकरी #महाराष्ट्र_शेतकरी #शेतकरी_कर्जमाफी #कर्जमाफी #प्रोत्साहन_अनुदान #शेतकरी_आर्थिक_मदत #दिवाळीपूर्वी_मदत #देवेंद्र_फडणवीस #अहिल्यानगर