भगूर शहराच्या विकासाला गती; मारवाडी गल्ली आणि आठवडे बाजार ते नमो उद्यान परिसरासाठी ५८ लाखांहून अधिक निधी मंजूर!

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 01/11/2026 2:50 AM


​भगूर शहराच्या विकासाला गती; मारवाडी गल्ली आणि आठवडे बाजार ते नमो उद्यान परिसरासाठी ५८ लाखांहून अधिक निधी मंजूर!

​भगूर प्रतिनिधी:

भगूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या भगूर नगर परिषदेच्या वतीने आणखी दोन महत्त्वपूर्ण विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे शहरातील मूलभूत सुविधा अधिक मजबूत होणार असून, भगूरच्या सौंदर्यातही मोठी भर पडणार आहे. नगराध्यक्ष सौ. प्रेरणा विशाल बलकवडे यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला आहे. 

मारवाडी गल्ली रस्ता काँक्रीटीकरण व ड्रेनेज काम: या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी ₹४७,१७,४९७/- इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या काँक्रीटीकरणामुळे आणि ड्रेनेजच्या कामामुळे येथील रस्ता अधिक मजबूत होणार असून नागरिकांचा त्रास दूर होणार आहे.

आठवडे बाजार ते नमो उद्यान रस्ता पेव्हर ब्लॉक व सुशोभीकरण: या परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि वाहतुकीची सोय सुलभ करण्यासाठी ₹११,७८,५००/- इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. याद्वारे या मार्गावर पेव्हर ब्लॉक बसवले जाणार असून परिसराचे सुशोभीकरण केले जाईल.

या विकासकामांच्या मंजुरीमुळे शहरातील रस्ते अधिक सुस्थितीत येण्यास मदत होणार असून, नागरिकांना दर्जेदार व आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. "विकासाचा ध्यास… भगूरच्या प्रगतीचा विश्वास!" आणि "आपले भगूर, सुंदर भगूर!" या संकल्पनेनुसार शहराचा विकास वेगाने होत असल्याने शहरवासीयांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या