देवळाली छावणी परिषद हद्दीत ५ नोव्हेंबरपासून पाणीपुरवठा एक दिवस आड होणार; प्रशासनाचा निर्णय

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 03/11/2026 11:21 AM


​देवळाली छावणी परिषद हद्दीत ५ नोव्हेंबरपासून पाणीपुरवठा एक दिवस आड होणार; प्रशासनाचा निर्णय

​देवळाली:

उन्हाळ्याची वाढलेली तीव्रता, चालू वर्षात झालेला अपुरा पाऊस आणि धरणांच्या पाणीपातळीत झालेली घट यामुळे देवळाली छावणी परिषद हद्दीत पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरळीत व नियोजनबद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी छावणी परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

​येत्या दिनांक ५/११/२०२६ (गुरुवार) पासून देवळाली छावणी परिषद हद्दीतील सर्व नागरıकांसाठी पाणीपुरवठा एक दिवस आड (एक दिवसाआड) केला जाणार असल्याची जाहीर सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणि त्रिपाठी (भा.र.स.से.) यांनी जारी केली आहे.

​शासनाच्या आदेशानुसार नवीन पाणीपुरवठा वेळापत्रक

​शासनाच्या आदेशानुसार आता छावणी हद्दीत एक दिवसाआड नियमित पाणीपुरवठा केला जाईल आणि त्याच्या पुढील दिवशी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. हा नवीन υक्रम पुढील सूचना मिळेपर्यंत कायमस्वरूपी लागू राहील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

​नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

​सध्याची पाण्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, देवळाली छावणी परिषद प्रशासनाने नागरıकांना खालीलप्रमाणे नम्र विनंती केली आहे:

  • ​नागरіकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा.

  • ​गरजेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा.

  • ​पाण्याचा अपव्यय (नासाडी) टाळावा.

​पाणीटंचाईच्या या काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन छावणी परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. 

Share

Other News

ताज्या बातम्या