सर्व विभागांनी दुष्काळी परिस्थितीत समन्वयाने काम करावे, जलजीवन मिशनच्या योजना प्राधान्याने पूर्ण कराव्यात-

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 03/11/2026 11:39 PM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

• पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. : टंचाईच्या काळात नागरिकांना पाणीटंचाई भासू नये यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या सर्व पाणी पुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करून तातडीने पाणी पुरवठा सुरू करावा. या योजना राबवताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करावी असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृाहात टंचाई आढावा बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे आमदार सर्वश्री धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, महेश शिंदे, सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
टंचाईच्या निवानार्थ कामांसाठी निधीची कमतरता भासू नये म्हणून आवश्यकतेनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, योजनांच्या कामात पारदर्शकता व गुणवत्ता राहावी यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी आणि त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा. किरकोळ कामे शिल्लक असलेल्या जीवन प्राधिकरणाच्या योजनांबरोबर पाणी पुरवठा योजनांचा वीज जोडण्याचा खर्च जिल्हा वार्षिक योजनेतील निधी उपलब्ध करुन द्यावा. नदी काठच्या जमिनीमध्ये चारा पिकं घेण्याचे नियोजन करावे. ज्या ठिकाणी ऊस उत्पादन होते तिथे चारा पिक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. तसेच शेतकऱ्यांना चारा पिकाचे बियाने उपलब्ध करुन द्यावे.

वन विभागाने वनवा लागून वनसंपदा नष्ट होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी दिले.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील दुष्काळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य दिले असून बोअर वेल आणि हातपंपांचे सर्वेक्षण करुन दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.


Share

Other News

ताज्या बातम्या