गुलाब कॉलनी पाण्याच्या टाकीच्या वितरण व्हॉल्व्हला असलेल्या गळतीमुळे दररोज अंदाजे २ ते ३ लाख लिटर पाणी वाया जात होते, त्याबाबत मी या https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid021eZCC9CU1Q3xtwRsYGy1VRnFDKC8QyxChHbzqaVSsGKRgjG3HJVHC55DUxSmbVfql&id=1731146962&mibextid=CDWPTG
लिंक वर असलेल्या व्हिडिओ मध्ये आणि त्यापूर्वीही मागणी केलेली होती
या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधून, दुरुस्तीचा आग्रह धरत सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर आज अखेर प्रशासनाला दखल घेऊन दुरुस्तीचे काम सुरू करावे लागले!
एकीकडे नागरिक पाणीटंचाईचा सामना करत असताना दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जाणे कदापि स्वीकारार्ह नाही.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केवळ नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करणे पुरेसे नाही, तर पाण्याचा अपव्यय रोखणे हीदेखील माझी जबाबदारी आहे.
दुरुस्ती पूर्ण होऊन गळती थांबेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील.
कारण पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे आणि नागरिकांच्या हक्काच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील!
— अभिजीत शकुंतला दत्तात्रय भोसले
नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य | प्रभाग क्र. १८
#प्रभाग१८ #पाणीटंचाई #पाणीबचत #सांगली #नागरिकहित